घरमनोरंजनसंजू'बाबा' करतोय मराठी चित्रपट

संजू’बाबा’ करतोय मराठी चित्रपट

Subscribe

संजय दत्त यांनी ट्विट करून आपले वडील आणि महान कलाकार सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत सहकार्यसाठी कायम आग्रही असतात. अक्षय कुमार,अजय देवगण,प्रियांका चोप्रा,अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत अनेक उत्तम मराठी चित्रपटांची निर्मीती केली आहे. आता अभिनेता संजय दत्त याचेही नाव या पंक्तीत जोडले जाणार आहे. संजय दत्त आणि मान्यता दत्त ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


एक कुटूंब घरावर येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून, कसे एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा म्हणजे ‘बाबा’ हा चित्रपट.
बाबा चित्रपटात दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत आहेत. त्याचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

- Advertisement -

संजय दत्त यांनी ट्विट करून आपले वडील आणि महान कलाकार सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला आहे. “आमचा पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ जी माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीस समर्पित करत आहोत. लव्ह यू डॅड! असे संजयने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -