घरमनोरंजनशाहरुखने दिली अपंग खेळाडूंना 'ही' भेट

शाहरुखने दिली अपंग खेळाडूंना ‘ही’ भेट

Subscribe

आंतरराष्ट्रीय अंपग दिना निम्मित बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने अपंगांना व्हिल चेअर वाटल्या. अपंग खेळाडूंचे समर्थन करण्यासाठी या व्हिल चेअर वाटण्यात आल्या.

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याने आपल्या अभिनयाने अनेकांचे मन जिंकून घेतले आहे. शाहरुखचे फॅन्स आज मोठ्या प्रमाणावत आहे. यामध्ये अपंगांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. जागतिक अपंगदिनी शाहरुखने अंपग खेळाडूंना भेट दिली आहे. या अपंगाना ५० व्हिल चेअर शाहरूखने वाटल्या आहेत. खेळाडूंचा उत्साह वाढण्यासाठी शाहरुखने या चेअर्स वाटल्या. खेळामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शाहरुख नेहेमी प्रयत्न करत असतो. क्रिकेट असो किंवा फुटबॉल शाहरुख नेहेमीच मैदानावर आपल्याला दिसतो. त्यामुळे अपंगानीही खेळात मागे राहू नये म्हणून शाहरुखने चेअर दिली.

- Advertisement -

 

- Advertisement -

आगामी चित्रपटाची जोरदार तयारी

शाहरुखचा आगामी चित्रपत्रही अंपगावर आधारित आहे. सध्या शाहरुख आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. शाहरूखच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. शाहरूखची आगामी चित्रपटातील भूमिका बघण्यासाठी त्याच्या फॅन्समध्ये उत्सुकता आहे. शाहरूखच्या वाढदिवशी त्याच्या फॅन्सनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला होता. शारीरिक व्यंगाकडे दुर्लक्ष करत आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगण्याचा संदेश या चित्रपटातून दिला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -