घरमनोरंजन“बाबा” लघुपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस

“बाबा” लघुपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

१२ जानेवारीला होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

स्त्री भ्रूण हत्येवर आधारित शेतकरी बापाचे कथानक असलेल्या ‘बाबा’ हा लघुपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. १२ जानेवारीला हा लघुपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आदर्श प्रोडक्शन एम एच २० निर्मित या लघुपटाचे ट्रेलर नुकतेच यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात आले. नेटीझन्सकडून या ट्रेलरला तुफान प्रतिदास मिळत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील आईनंतर वडीलांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या शेतकरी बापाची कहाणी या लघुचित्रपटात चित्रित करण्यात आली आहे. लेखक नंदकिशोर सुर्यवंशी लिखित व सचिन ठोकळ दिग्दर्शित या लघुपटात मुलगी आणि वडीलांच्या अतुट नाते चित्रित करण्यात आले आहे. या ट्रेलरमधून मुख्य भूमिकेत झळकणारा अभिनेता आकाश ठोकळ अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तर अभिनेत्री साक्षी राठोडसह अभिनेते सचिन ठोकळ, सचिन अंभोरे, मनोज पगारे, मानसी शेवाळे, सुनिता शेवाळे, ज्ञानेश्वर तुपे, अमोल मगरे, रोहित मोतीचूर, सुनील सदावर्ते, अमोल जोगदंडे, आदित्य सोनवणे, गणेश भालेराव, मास्टर सिद्धी, आरोही अशी बडी स्टारकास्ट या लघुपटाच्या माध्यामातून झळकणार आहे.

या लघुचित्रपटाची तांत्रिक व चित्रीकरणाची बाजू प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अभिजित गाडेकर यांनी सांभाळली असून चित्रपटाला अनिकेत गाडेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. तर कलरीस्ट श्रीकृष्ण खेकाळे यांनी केली आहे. या चित्रपटाचे प्रोमोशन आणि पब्लिसिटी सचिन मल्टीमिडिया यांनी केली. आदर्श एम एच २० प्रोडक्शनने विविध चित्रपटाची निर्मिती करून जगभरात होणाऱ्या विविध राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला असून भविष्यातील विविध चांगल्या चित्रपट निर्मितीसाठी अनेक प्रकल्प हाती घेणार असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन ठोकळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितेले.

- Advertisement -

हेही वाचा – रियामुळे आणखी एक सेलिब्रिटी अडचणीत, होतोय ट्रोलर्सचा शिकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -