‘द लायन किंग’ मधील टिमॉनसाठी ‘या’ मराठी कलाकाराने दिला आवाज

अभिनेता शाहरूख खान आणि आर्यन खान याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील मराठमोळ्या श्रेयस तळपदे या अभिनेत्याने या चित्रपटातील टिमॉन या भूमिकेसाठी दिला आपला आवाज

Mumbai

सध्या बॉलिवूड विश्वात ‘द लायन किंग’ या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून किंग खान म्हणजे अभिनेता शाहारूख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच चित्रपट विश्वात पदार्पण केले आहे. या चित्रपटामध्ये आर्यन खानने सिंबाच्या तर स्वतः शाहारूख खानने मुसाफाच्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे. अभिनेता शाहरूख खान आणि आर्यन खान याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील मराठमोळ्या श्रेयस तळपदे या अभिनेत्याने या चित्रपटातील टिमॉन या भूमिकेसाठी आपला आवाज दिला आहे.

हेही वाचा – ज्युनिअर शहारूख पदार्पणासाठी सज्ज; वडिलांसह करणार डेब्यू

नुकतेच एका मुलाखतीमध्ये श्रेयसने या चित्रपटातील टिमॉन या भूमिकेसाठी आवाज देण्यामागचे कारण देत खुलासा केला आहे. ‘आयएएनएस’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयस म्हणाला की, ‘मी हा चित्रपट फक्त माझ्या मुलीकरिता आज्ञासाठी करण्याचे ठरवले. आता ती खूपच लहान आहे. परंतु ज्यावेळी ती मोठी होऊन हा चित्रपट बघेन तेव्हा माझा आवाज ती नक्कीच ओळखू शकेल. त्यावेळी माझ्या कामाचा माझ्या मुलीला अभिमान वाटावा असं काहीतरी मला तिच्यासाठी करायचं आहे. त्यासाठी मी हा चित्रपट साइन केला.’

या चित्रपटामध्ये टिमॉनच्या भूमिकेसाठी आवाज देण्यासोबतच या चित्रपटात ‘हकूना मटाटा’ हे गाणं देखील गायले आहे. हे इंग्लिश गाणं हिंदीमध्ये पुन्हा डब केले आहे. या गाण्याबद्दल बोलताना श्रेयसने आपला अनुभव शेअर केला आहे.

‘मी टिमॉनच्या डबिंगसाठी जायचो त्यावेळी मी हे गाणे गुणगुणत असे. त्यावेळी डबिंग डायरेक्टरने मला ऐकले. त्यावेळी त्यांनी हे गाणे चित्रपटासाठी म्हणशील का असे विचारले. त्यावेळी कोणतीही मनाची तयारी नव्हती. कारण गाणे हे माझ्यासाठी खूप नवीन होते. तरी देखील मी सकारात्मक राहून मला हे गाणं गायला जमेल आणि मी तयार झालो.’