घरमनोरंजनआलियाचा मुक्काम पोस्ट पुणे

आलियाचा मुक्काम पोस्ट पुणे

Subscribe

मराठी चित्रपटाचे थोडेफार चित्रीकरण आजही मुख्य शहरात होताना दिसते, पण हिंदीतले कलाकार पुण्या मुंबईत उघडपणे चित्रीकरण करायला मागत नाहीत. त्याला कारण म्हणजे उसळणारी गर्दी सेलिब्रिटी कलाकारांना त्रास देणारी असते. मुंबईत असलेल्या स्टुडिओतही फारसे शूटिंग होताना दिसत नाही. मग महाराष्ट्राच्या बाहेर गोवा, हैद्राबाद, दिल्ली, राजस्थान अशा ठिकाणी तिकडच्या सरकारी सुविधा असल्यामुळे निर्मात्यांना चित्रीकरण करणे सोपे जाते. एस एस राजामौली याने आपल्या दिग्दर्शनात ‘आर आर आर’ हा चित्रपट करायला घेतलेला आहे. ज्यात ज्युनिअर एन टी आर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. अजय देवगण, आलिया भट यांच्यावरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका सोपवलेली आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हैद्राबादमध्ये झालेले आहे. इथेच सेट उभारून अन्यही प्रसंगांचे चित्रीकरण करावे, असा अजय, आलिया यांचा आग्रह होता. सेट उभारला जाईल पण कथानकाला आवश्यक अशा वातावरण निर्मितीचे काय हे राजामौली यांनी आलियाला पटवून सांगितले. पुण्यामध्ये सेट उभारून वीस दिवस चित्रीकरण होणार आहे. बर्‍याच दिवसांनी पुण्यात हिंदी चित्रपटासाठी सेट उभारला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रीकरणाच्या निमित्ताने आलियाचा मुक्काम पोस्ट पुणे असणार आहे. सध्या गुजरातमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुण्यात शूटिंग सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -