Video: सनी लिओनीचं ‘हॅलो जी’ गाणं व्हायरल

Mumbai
sunny leone taught dance steps to fabs on hello ji song video viral
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी

नुकतचं बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीचं ‘हॅलो जी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावर तिने अप्रतिम डान्स केला आहे. सध्या या गाण्याचा व्हिडिओ युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्यामधील सनीने केलेल्या डान्स स्टेप्स देखील खूप प्रसिद्ध होत आहे. सनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर ‘हॅलो जी’ गाण्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

‘रागिनी एमएमएस रिटर्न्स सिझन २’ मधील ‘हॅलो जी’ हे गाणं आहे. आतापर्यंत युट्यूबवर या गाण्याच्या व्हिडिओ १ करोड पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं गायिक कनिका कपूरने गायलं आहे. या गाण्यातील सनीचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. लवकरच ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स सिझन २’ प्रदर्शित होणार आहे. या सिझनमध्ये वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल दिसणार आहे.

सनी लिओनी सध्या रणविजयसोबत स्प्लिट्सविला होस्ट करत आहे. २०१२ मध्ये सनीने ‘जिस्म २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. यानंतर ती अनेक आयटम साँगमध्ये दिसून आली. सनीचं ‘रईस’ मधील ‘लैला’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होत. लवकरच सनी उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित असलेला ‘कोका कोला’ या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटाची तारीख ही अजून निश्चित झालेली नाही. तसंच ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात सनी दिसणार आहे.


हेही वाचा – Video: हिनाच्या ‘या’ हॉट डान्सवर नेटकरी फिदा