‘मनमर्जिया’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज !

मनमर्जिया चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक बच्चन तब्बल २ वर्षांनी मोठ्या पडद्यावर येणार असल्यामुळे, त्याचे चाहते खुश आहेत.

Mumbai
manmarziyan trailer
सौजन्य-युट्यूब

अभिषेक बच्चन, विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मनमर्जिया’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती फक्त मनमर्जिया चित्रपटाच्या ट्रेलरची. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या तिनही कलाकारांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला भरभरुन पसंती मिळते आहे. येत्या १४ सप्टेंबरला मनमर्जिया प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि तापसी पन्नूची केमिस्ट्री, सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. तापसी आणि विकी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे त्यांच्यातील ही लव्ह केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरते आहे. तर दुसरीकडे मनमर्जियाच्या निमित्ताने अभिषेक बच्चन तब्बल २ वर्षांनी मोठ्या पडद्यावर येणार असल्याने त्याचे चाहतेही खुश आहेत. याआधी अभिषेक २०१६ साली आलेल्या ‘हाऊसफुल 3’ या चित्रपटात झळकला होता.

ल्व्ह ट्रँगल की आणखी काही?

मनमर्जिया चित्रपटाचा ट्रेलर पाहताना तापसी, अभिषेक आणि विकी यांच्यामध्ये लव्ह ट्रँगल आहे की आणखी काही नातं? हे चटकन लक्षात येत नाही. ट्रेलरच्या सुरुवातीलाच विकी कौशलसोबत लव्ह सीनमध्ये दिसणारी तापसी, ट्रेलरच्या शेवटी मात्र तापसी अभिषेक बच्चनसोबत लग्नाच्या जोड्यात दिसते आहे. ट्रेलर पाहताना आपल्या लक्षात येते की तापसी, अभिषेक आणि विकी या दोघांसोबतही कधी भांडताना दिसते तर कधी प्रेमाने बोलताना. त्यामुळे तापसीची जोडी कथेत नेमकी कोणासोबत जमणार? याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. आता या तिघांमध्ये लव्ह ट्रँगल आहे की कोणती मजबूरी याचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होईल.