घरमनोरंजनTanhaji The Unsung Warrior: अजय देवगणने 'या'साठी मानले 'मनसे'चे आभार

Tanhaji The Unsung Warrior: अजय देवगणने ‘या’साठी मानले ‘मनसे’चे आभार

Subscribe

अजयने अमेय खोपकर यांचे पाठिंबा दर्शवणाऱ्या पत्रास रिट्विट केले असून हिंदीतून डब केलेला मराठी तान्हाजीसाठी मनसे आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचे मानले आभार

अजय देवगणचा तान्हाजी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. चाहत्यांपासून ते कलाकार मंडळींचीही या ट्रेलरला पसंती मिळत आहे तर काहींनी या ट्रेलरमधील एक-दोन दृश्यांवर आक्षेप देखील घेतला आहे. दरम्यान, अभिनेता अजय देवगणने चाहत्यांसह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले आहे. अजयने मनसेचे आभार मानण्यामागे तसे खासच कारण आहे.

याकरता मानले मनसेचे आभार

तान्हाजी द अनसंग वॉरियर हा हिंदी भाषेतील चित्रपट डब करून मराठी भाषेत अजय देवगण चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. शक्यतो हिंदी भाषेतील चित्रपट डब करण्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत असणारा सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा शूर पराक्रम, वीरता अनेकांपर्यंत पोहोचवा यासाठी मनसेने या चित्रपटाच्या हिंदीतून मराठीत डबिंग करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. याच खास कारणांसाठी मनसे आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचे आभार मानले आहे.

- Advertisement -

अजयने अमेय खोपकर यांचे पाठिंबा दर्शवणाऱ्या पत्रास रिट्विट केले असून हिंदीतून डब केलेला मराठी तान्हाजीसाठी मनसे आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचे आभार मानले आहे. तसेच ही आमच्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही एका मराठा योद्ध्याची कथा राष्ट्रीय भाषेसह मातृभाषेत दाखवणार आहोत, असे देखील अजयने सांगितले.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरने असे लिहिले होते पत्र

- Advertisement -

चित्रपटात अजय तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी सिंहासारखे लढणारे तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तान्हाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते.


Tanhaji Poster: तान्हाजी चित्रपटातील काजोलचा दमदार लूक रिव्हील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -