TikTok स्टार सिया कक्कडने केली आत्महत्या

Mumbai
Siya Kakkar

टिकटॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी या युवतीने आपले जीवन संपवले आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या एक दिवस आधी सियाने मॅनेजर अर्जुन सरीन यांच्याशी एका गाण्यासंबंधी चर्चा केली होती. अर्जुन यांनी सांगितले की त्यावेळी सिया एकदम व्यवस्थित होती. ती कोणत्याही तणावाखाली बोलत नव्हती. तिने अचानक हे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही.

View this post on Instagram

1 or 2 ?🌟💃🏻😍 #bellaciao #skechers

A post shared by Siya Kakkar (@siya_kakkar) on

सियाने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तो व्हिडिओ तिने ६ दिवसांपूर्वी तिच्या इंटाग्राम पेजवर शेअर केला होता. टिकटॉक स्टार असलेल्या सियाचे इंटाग्रामवरही तब्बल एक लाखाहून अधिक फॉलोअर्स होते.

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या जवळच्या लोकांची चौकशी सुरू केली असून आत्महत्येचे कारण शोधून काढण्यासाठी ते तपास करत आहेत.

हेही वाचा –

सीबीएससीच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here