घरट्रेंडिंग'ती आता Masoom राहिलेली नाही', उर्मिला मातोंडकरवरचं जुनं Amul Cartoon व्हायरल!

‘ती आता Masoom राहिलेली नाही’, उर्मिला मातोंडकरवरचं जुनं Amul Cartoon व्हायरल!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण सुरू झाल्यापासून या प्रकरणानं अनेक नवनवी वळणं घेतली आहेत. तीन महिन्यांनंतर हे प्रकरण आता उर्मिला मातोंडकर विरूद्ध कंगना रनौत (Kangana Ranaut) या वादापर्यंत येऊन ठेपलं आहे. बॉलिवुडमधल्या घराणेशाहीवर, कास्टिंग काऊचवर टीका करता करता कंगना कधी शिवसेनाविरोधी झाली, हे नेटिझन्सला देखील कळलं नाही. दिवसेंदिवस येणाऱ्या कंगना रनौतच्या ट्वीट्सला उत्तर देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला (Urmila Matondkar) कंगनानं ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हटल्यानंतर बॉलिवुडमधूनच नव्हे, तर राजकीय विश्वातून देखील तिच्यावर टीका होऊ लागली आहे. विशेषत: काँग्रेसनं या प्रकरणावर कंगनाला धारेवर धरलं आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर एक Amul Cartoon भलतंच व्हायरल होऊ लागलं होतं. त्यावरून अनेक नेटिझन्सनी अमूललाच टार्गेट करत टीका केली होती. शेवटी खरा प्रकार समोर आला आणि अमूलवर टीका करणाऱ्या नेटिझन्सवर खजील होण्याची पाळी आली.

amul cartoon on urmila matondkar rangeela viral

- Advertisement -

तर त्याचं झालं असं की…

एक Amul Cartoon सकाळपासून व्हायरल व्हायला सुरुवात झाली. ते आजचंच असल्याचा गैरसमज नेटिझन्सचा झाला. त्यामुळे ते व्हायरल व्हायला लागलं. त्याला कारणही तसंच होतं. कार्टूनमध्ये उर्मिला मातोंडकरचा रंगीलामधला एक लुक होता आणि त्यावर कॅप्शन होती, Not MASOOM anymore अर्थात आता ती मासूम राहिलेली नाही! उर्मिला सध्या ज्या प्रकारे कंगना रनौतला सडेतोड उत्तर देत आहे, त्यावरूनच अमूलनं हे नवीन कार्टून बनवलं की काय, असा गैरसमज पसरला आणि यातून अमूलवर काही नेटिझन्सनी टीका करायला सुरुवात केली.

- Advertisement -

देशात होणाऱ्या प्रमुख घटनांवर अमूल गेल्या अनेक वर्षांपासून कार्टून बनवत आला आहे. २५ वर्षांपूर्वी जेव्हा Rangeela सिनेमा रिलीज झाला, तेव्हा अमूलने उर्मिला मातोंडकरची प्रगती अधोरेखित करणारं हे कार्टून बनवलं होतं. Masoom सिनेमामध्ये उर्मिलाने बाल कलाकाराची भूमिका केली होती. मात्र, रंगीलामध्ये ती बालकलाकार राहिलेली नसल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं असा या कार्टूनचा अर्थ होता.

दरम्यान, ८ सप्टेंबरला रंगीला सिनेमाला २५ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने सिनेमाचे दिग्दर्शक Ram Gopal Varma यांनी हे पोस्टर ट्वीट करत त्याची आठवण करून दिली होती. मात्र, तरीदेखील नेटिझन्सकडून या पोस्टरचा चुकीचा अर्थ लावला जात असल्यामुळे अखेर दिग्दर्शक Anurag Kashyap यांनी ट्वीट करून हा गैरसमज दूर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -