विवेक ऑबेरॉयने पोस्ट डिलीट करण्याचा सुजाणपणा तरी दाखवावा – उर्मिला मातोंडकर

बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी विवेक ऑबेरॉयच्या वादग्रस्त ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्मिला यांनी विवेक ऑबेरॉयवर टीका केली असून त्याला माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.

Mumbai
urmila matondkar
उर्मिला मातोंडकर

बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयने शनिवारी ट्विटरवर शेअर केलेले मीम त्याच्या चांगल्याच अंगलठी आले आहे. या ट्विटवरुन नेटीझन्सने विवेकला प्रचंड झोडपले आहे. याशिवाय महिला आयोगाने त्याच्या विरोधात नोटीस बजावली आहे. आता त्याच्या या ट्विटवरुन बॉलिवूडची रंगीला गर्ल आणि काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार उर्मिला मातोंडर यांनी देखील टिका केली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी त्याला ते ट्विट डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय विवेकने शेअर केलेले मीम्स चुकीचे असल्याचे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत.

नेमकं काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर?

उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन विवेक ऑबेरायच्या वादग्रस्त ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, ‘विवेक ऑबेरॉयची ही वागणूक चुकीची आहे. आता तरी विवेकने ती पोस्ट डिलीट करण्याचा सुजाणपणा दाखवावा. याशिवाय ऐश्वर्या रॉय आणि तिची लहान मुलगी आराध्या यांची माफी मागावी.’

माफी मागणार नाही – विवेक ऑबेरॉय

विवेक ऑबेरॉयने आपल्या वादग्रस्त टिकेवर माफी मागणार नाही, असे म्हटले होते. विवेक ऑबेरॉयच्या वादग्रस्त ट्विटरवर सोनम कपूरने त्याच्यावर टिका केली होती. त्यानंतर त्याने सोनम कपूर उगाच विषय वाढवत असल्याचे म्हटले होते. आता सोनम कपूर नंतर उर्मिला मातोंडकरने त्याच्यावर टिका केली आहे. दरम्यान, विवेक ऑबेरॉयने ती वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे.


हेही वाचा – विवेकला अजूनही ऐश्वर्याची आठवणं येते? एक्झिट पोलवर शेअर केलं मीम

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here