घरमनोरंजनराजेश खन्ना इंडस्ट्रीतला सर्वात कंजूस अभिनेता - वहिदा रेहमान

राजेश खन्ना इंडस्ट्रीतला सर्वात कंजूस अभिनेता – वहिदा रेहमान

Subscribe

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना हे भयंकर कंजूस होते! खुद्द वहीदा रेहमान यांनीच हे सांगितलं आहे.

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या राजेश खन्नांनी बॉलिवूड चाहत्यांच्या आख्ख्या एका पिढीला अक्षरश: वेड लावलं होतं. अजून देखील त्यांच्या सिनेमांचे लाखो चाहते आहेत. मात्र, बॉलिवूडमध्या त्यांच्या समकालीन अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी मात्र राजेश खन्ना यांच्यावर नकारात्मक टिप्पणी केली आहे. ‘राजेश खन्ना बॉलिवूडमधल्या सर्वात कंजूस अभिनेत्यांपैकी आहेत’. सोनी टीव्हीवरच्या सुपरस्टार सिंगर या शोमध्ये त्यांना पाहुण्या म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राजेश खन्ना लेटकमर होते…!

या कार्यक्रमादरम्यान शोचा अँकर जय भानुशालीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यातलाच प्रश्न होता की, ‘सेटवरचा सर्वात कंजूस अभिनेता कोण होता?’ या प्रश्नाला उत्तर देताना वहिदा रेहमान म्हणाल्या, ‘राजेश खन्ना हा तेव्हा बॉलिवूडमध्ये सर्वात कंजूस अभिनेता होता. जेव्हा कधी कुणी पैशाबद्दल बोलायचं, तेव्हा तो हळूच तिकडे दुर्लक्ष करून निघून जायचा. तो शूटसाठी उशिरा देखील यायचा. तो लेटकमर होता. त्याला तास न् तास उशिर व्हायचा. एवढा की सकाळच्या शिफ्टला तो थेट दुपारनंतर पोहोचायचा’.

- Advertisement -

हेही वाचा – राणू मंडलवर लता मंगेशकर नाराज?

‘शशी कपूर हॅण्डसम आणि मस्तीखोर’

दरम्यान, यावेळी भानुशालीने त्या काळातल्या अभिनेत्यांची त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार क्रमवारीत नावं सांगायला सांगितली. यावेळी वहिदा यांनी शशी कपूर यांचं नाव घेतलं. ‘शशी कपूरजी हे फार हॅण्डसम आणि चांगले व्यक्तिमत्व होते. ते सेटवर खूप मस्ती करायचे’, असं वहिदा यावेळी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -