घरताज्या घडामोडीविकास दुबेवर चित्रपटाची घोषणा, मनोज वाजपेयी साकारणार भूमिका?

विकास दुबेवर चित्रपटाची घोषणा, मनोज वाजपेयी साकारणार भूमिका?

Subscribe

विकास दुबे एन्काउंटर नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काहीजण यूपी सरकारवर प्रश्न उपस्थित करीत आहेत तर काही पोलिस खात्यावर बोट दाखवत आहेत. तर काही जणांनी तर विकास दुबेवर चित्रपट काढण्याची तयारी केली आहे. बॉलिवूडमध्ये गुंडांबद्दल सतत चित्रपट येत असतात. विकास दुबे यांच्या चकमकीनंतर बातमी होती की दिग्दर्शक संदीप कपूर एक फिल्म तयार करणार आहेत ज्यात मनोज बाजपेयी दिसणार आहे. पण मनोज वायपेयीने मात्र नकार दिल्यास समजत आहे.

विकास दुबे चकमकीवर आपण चित्रपट बनवणार असल्याची इच्छा दिग्दर्शक संदीप कपूरने सोशल मीडियावर बोलून दाखवली. यात त्यांनी विकास दुबेच्या भूमिकेसाठी मनोज बाजपेयी यांना घ्यायचे आहे असेही म्हटलं होतं. ही गोष्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर उलट सुलट चर्चाही रंगल्या. पण मनोज वाजपेयीने दिलेल्या उत्तरानंतर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. मनोज वाजपेयीने ही बातमी फेटाळून लावली आहे. मनोज बाजपेयी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘खोटी बातमी’.

- Advertisement -

कुख्यात गुंड विकास दुबे कानपूर पोलिसांकडून एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. काल विकास दुबेला अटक करण्यात आली होती. आज सकाळी उत्तर प्रदेशची स्पेशल फोर्स टीम त्यांना मध्य प्रदेशच्या उजैवमधून कानपूर येथे आणत असताना गाडीचा अपघात झाला. या दरम्यान, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यात तो मारला गेला.


हे ही वाचा – अभिनेत्रीवर बलात्कार करताना आरोपीने व्हिडिओ केला शूट, तक्रार दाखल!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -