घरमनोरंजनवादग्रस्त ट्विटवर अखेर विवेक ओबेरॉयने मागितली माफी

वादग्रस्त ट्विटवर अखेर विवेक ओबेरॉयने मागितली माफी

Subscribe

वादग्रस्त ट्विटवर अखेर विवेक ओबेरॉयने माफी मागितली आहे. आपल्या ट्विटमुळे कोणत्याही महिलेचा अपमान झाला असेल, तर मी माफी मागतो, असे विवेक म्हणाला आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयने शेअर केलेल्या वादग्रस्त ट्विटवर अखेर माफी मागितली आहे. सोमवारी संध्याकाळी विवेक ऑबेरॉयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटर एक मीम शेअर केले होते. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट आणि ओपनिंग पोलचा धागा पकडत त्या मीममध्ये ऐश्वर्या रॉय, सलमान खान आणि विवेक ओबरॉय यांच्या अफेर संदर्भातील जुन्या गोष्टी उकरुन काढण्यात आल्या आहेत. हे मीमी विवेकने जरी बनवले नसले तरी त्याने ते शेअर केले आहे. त्यामुळे नेटीझन्सनी त्याला चांगलेच सुनावले आहे. विवेक ऑबेरॉयचा त्या ट्विटवर मोठे वादविवाद झाल्यानंतर अखेर विवकने माफी मागितली आहे. शिवाय, ती पोस्ट देखील डिलीट केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विवेक ऑबेरॉयने पोस्ट डिलीट करण्याचा सुजाणपणा तरी दाखवावा – उर्मिला मातोंडकर

काय म्हणाला विवेक ओबेरॉय?

विवेक ओबेरॉयने ट्विटकरुन माफी मागितली आहे. तो म्हणतो की, यामागे माझा कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता माझ्या ट्विटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीरपणे माफी मागतो. याशिवाय, महिलेच्या सक्षमीकरणासाठी मी गेल्या १० वर्षांपासून काम करत आहे. आतापर्यंत मी २००० मुलींचे पुनर्वसन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विवेकला अजूनही ऐश्वर्याची आठवणं येते? एक्झिट पोलवर शेअर केलं मीम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -