‘ये रे ये रे पैसा २’ हा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला

'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव नसून हेमंत ढोमे करत आहे.

Mumbai
ये रे ये रे पैसा २

संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट ५ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. हिंदीतील हेराफेरी या चित्रपटाप्रमाणेच ‘ये रे ये रे पैसा’ हा मराठी चित्रपट आला होता. या चित्रपटाने सर्व प्रेक्षकांची बऱ्यापैकी करमणूक केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. ‘ये रे ये रे पैसा २’ हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. अमेच विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेला हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनचा भार आता हेमंत ढोमे याने सांभाळला आहे.

‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधवनं सनी आणि उमेश कामतनं आदित्य तर तेजस्विनी पंडितनं बबली ही व्यक्तीरेखा साकारली होती. या तिघांच्या आयुष्यात पैशामुळे उलथापालथ होताना या चित्रपटात दाखवलं होते. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला होता.

या चित्रपटात अण्णाची भूमिका करणारा संजय नार्वेकर हा पहिल्या भागात आफ्रिकेला गेलेला दाखवला होता. आता येणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटात अण्णा हा भारतात परत येताना दाखवणार आहे. आता वसुलही मोठी होणार आणि पैसा देखील असा दावा चित्रपटाच्या टीमनं केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here