घरफिचर्स‘पुलोद’नंतर नऊ वर्षांनी पवार परतले होते काँग्रेसमध्ये...

‘पुलोद’नंतर नऊ वर्षांनी पवार परतले होते काँग्रेसमध्ये…

Subscribe

एका बाजूला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना दुपारनंतर चर्चा मात्र शरद पवार आणि राहुल गांधी यांची आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबतची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

अचूक टायमिंग आणि जोडण्याचे जुळविण्याचे राजकारण यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार प्रसिद्ध आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पुलोदचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आणि वयाच्या ३८व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. आजही मोदी सरकारचा दुसरा शपथविधी चर्चेत असताना राहुल गांधी यांची पवारांनी भेट घेतली आणि विजयी भाजपाच्या शपथविधीनंतर या भेटीचीच चर्चा सुरू आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलिनीकरणाच्या शक्यतेमुळे. पुलोद सरकारचा प्रयोग केल्यानंतर ९ वर्षांनंतर पवारांनी त्यावेळी असाच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हे वाचा – १९९९ ची चूक २०१९ ला सुधारणार; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार?

शरद पवार सर्वप्रथम इ.. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून वयाच्या २९व्या वर्षी समावेश झाला. .. १९७२ आणि इ.. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. .. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पडले.

- Advertisement -

हे कळलं का – शरद पवारांची मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दांडी; हे आहे कारण

पुलोदचा प्रयोग आणि मुख्यमंत्री पवार

- Advertisement -

१८ जुलै इ.. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस () पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. .. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

लोकसभेत प्रवेश

.. १९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता. मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च इ.. १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस() पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

९ वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

.. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली.

(संदर्भ : विकिपीडिया)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -