घरफिचर्ससारांशया वर्षीचा सर्वोत्तम टेनिसपटू ः डॅनिल मेदवेदेव

या वर्षीचा सर्वोत्तम टेनिसपटू ः डॅनिल मेदवेदेव

Subscribe

वर्षअखेरच्या या मानाच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा डॅनिल मेदवेदेव हा दुसरा रशियन टेनिसपटू. याआधी 2009 मध्ये रशियाच्या डेव्हडेंकोने हा मान मिळवला होता. गेल्या वर्षी प्रथमच सतत चांगली कामगिरी करून या स्पर्धेत प्रवेश मिळवणार्‍या मेदवेदेवने तेव्हा प्राथमिक साखळीतील एकही सामना न जिंकल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. यंदा मात्र त्याने लंडन येथे झालेल्या या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ठ्य असे की, गेली सहा वर्षे या स्पर्धेला दरवर्षी नवा विजेता मिळाला आहे. जोकोविच, अ‍ॅन्डी मरे, ग्रिगॉर दिमित्रोव, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव, त्सित्सिपास, आणि आता मेदवेदेव.

रशियाचा डॅनिल मेदवेदेव हा या वर्षातला सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे. यंदाच्या टेनिस मोसमातील अखेरची एटीपी मास्टर्स स्पर्धा त्याने जिंकली आणि तीदेखील टेनिसमधील पहिल्या तीन अव्वल क्रमांकांच्या खेळाडूंचा पराभव करून. असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. या विजयामुळे त्याला 15,64,000 डॉलर आणि 1500 रँकिंग गुण मिळाले. 1970 साली सुरू झालेल्या या स्पर्धेचे नाव बर्‍याचदा बदलले, तरी मान कायम आहे. त्यामुळेच तिला फेडरसह अन्य प्रख्यात खेळाडूही महत्त्व देतात.

या स्पर्धेत टेनिसमधील वर्षातील मास्टर्स स्पर्धांतील कामगिरीनुसार दिलेल्या गुणांच्या आधारे आठ खेळाडूंना प्रवेश मिळतो. दोन गटात साखळी सामने, नंतर उपान्य व अंतिम फेरी असे स्पर्धेचे स्वरूप असते. त्यामुळेच स्पर्धेच्या विजेत्याला वर्षातला सर्वोत्तम टेनिसपटू हा मान मिळतो. यंदाच्या स्पर्धेत त्सित्सिपास, रुबलेव, झ्वेरेव, श्वार्त्झमन, थिएम, मेदवेदेव, नदाल आणि जोकोविच यांनी प्रवेश मिळवला होता.

- Advertisement -

वर्षअखेरच्या या मानाच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा मेदवेदेव हा दुसरा रशियन टेनिसपटू. याआधी 2009 मध्ये रशियाच्या डेव्हडेंकोने हा मान मिळवला होता. गेल्या वर्षी प्रथमच सतत चांगली कामगिरी करून या स्पर्धेत प्रवेश मिळवणार्‍या मेदवेदेवने तेव्हा प्राथमिक साखळीतील एकही सामना न जिंकल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. यंदा मात्र त्याने लंडन येथे झालेल्या या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ठ्य असे की, गेली सहा वर्षे या स्पर्धेला दरवर्षी नवा विजेता मिळाला आहे. जोकोविच, अ‍ॅन्डी मरे, ग्रिगॉर दिमित्रोव, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव, त्सित्सिपास, आणि आता मेदवेदेव. या काळात जागतिक क्रमवारीत फारसा बदल झाला नाही तरी! यंदा रॉजर फेडरर दुखापतीमुळे दीर्घकाळ कोणत्याच स्पर्धेत खेळला नव्हता. त्यामुळे त्याची अनुपस्थिती जाणवली.

या स्पर्धेबाबत एक आश्चर्याची म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे, गेले किमान दशकभर क्रमवारीमध्ये बहुतेक सर्वकाळ पहिल्या तीन क्रमांकातच असणार्‍या राफा नदालला मात्र ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. फेडरर आणि जोकोविच यांनी ज्यावर्षी पहिले ग्रँड स्लॅम स्पर्धेतील जेतेपद मिळवले त्याच वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. उलट मेदवेदेवने आजवर एकाही ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही. त्यामुळे त्याचे यश विशेषच आहे.

- Advertisement -

मेदवेदेवने गटवार साखळीत श्वार्त्झमनचा 6-3; 6-3; अलेक्झांडर झ्वेरेवचा 6-3; 6-4 असा पराभव केला; पाठोपाठ ही स्पर्धा तब्बल सहावेळा जिंकणार्‍या, सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानवर असणार्‍या नोवाक जोकोविचवरही सरळ सेटमध्ये 6-3; 6-3 अशी मात केली आणि उपान्त्य आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. जोकोविचला त्याआधीही श्वार्त्झमनने हरविले होते आणि त्यामुळे अर्थातच त्याला उपान्त्य फेरीत प्रवेश मिळाला नाही.

यंदाची खुली फे्रंच स्पर्धा कोरोनामुळे वेळापत्रक बदलावे लागल्याने ऑक्टोबरमध्ये झाली. ती जिंकून नदालने ग्रँडस्लॅम मालिकेत 20 वे विजेपेपद मिळवून फेडररशी बरोबरी साधली होती. त्यावेळच्या त्याच्या खेळावरून तो यंदा मास्टर्स स्पर्धा जिंकेल असा अंदाज होता. कारण प्रथम क्रमांकावरील जोकोविचला कोणतीही संधी न देता तो सरळ तीन सेटमध्ये जिंकला होता. त्याला हे विजेतेपद मिळवायची तीव्र इच्छा होती. परंतु उपान्त्य सामन्यातच मेदवेदेवने त्याला 3-6; 7-6; 6-3 असे पराभूत केले. पहिला सेट घेतल्यावर, दुसरा सेट जिंकण्याची संधी नदालने गमावली आणि ती चूक त्याला महागात पडली. या विजयामुळे मेदवेदेवचा आत्मविश्वास वाढला. अंतिम सामन्यात त्याने यंदाचा खुल्या अमेरिकन स्पर्धेचा विजेता थिएम याला 4-6; 7-6; 6-4 असे हरवून त्या स्पर्धेतील पराभवाची फेड केली. मेदवेदेवची जिद्द म्हणता येईल अशी बाब म्हणजे उपान्त्य आणि अंतिम सामन्यात त्याने पहिला सेट गमावला होता. तरीही दुसर्‍या सेटमध्ये त्याच्या सरस प्रतिस्पर्ध्यांवर टायब्रेकरमध्ये त्याने मात केली. थिएमनेही जोकोविचवर 7-5; 6-7; 7-6 अशी मात केली होती.

गेल्या चार विजेत्यांना या यशानंतर फारसा पराक्रम दाखवता आलेला नाही. 24 वर्षाचा मेदवेदेव पुढे काय करतो याबाबत म्हणूनच उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -