घरफिचर्ससारांशथंडीचे विज्ञान

थंडीचे विज्ञान

Subscribe

थंडी म्हटली तर गुलाबी नाही तर बोचरी. कडक उन्हाळा आणि धो धो पावसानंतर येणार्‍या थंडीची सर्वांना उत्सुकता असते. स्वेटर, मफलर, कानटोपी कपाटातून बाहेर पडत असताना आणि गरम गरम चहाचा आस्वाद घेत ’काय छान थंडी’ पडलीय असं एकमेकांशी संवाद साधताना त्यात असतं ते थंडीचं गुणगान. मात्र गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्रातील बदलाचा थंडीवर सुद्धा परिणाम होऊ लागला असून ती आता गुलाबी वाटत नाही. काय वारा सुटलाय... असं काहीस उगाच म्हणायचे म्हणून तिची आता बोळवण होतेय. या सार्‍यावर एका नजर टाकताना हे असे का होतेय याचा घेतलेला हा वेध...

उत्तरे कडून म्हणजे अफगाणिस्तानातून हिमालयाला वळसा घालून भारतात प्रवेश करणार्या पश्चिमी वार्यामुळे निर्माण होणारा क्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हा परीणाम असणार आहे असे या मागचे विज्ञान आहे.

देशातील लदाख, जम्मू-काश्मिर, शिमला आदी भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे देशाची राजधानी गारठली आहे.

- Advertisement -

नुकतेच दिल्लीतील तापमान गेल्या पंधरा वर्षांच्या काळात प्रथमच जानेवारीत एक अंश सेल्सिअस एवढे ’रेकॉर्ड ब्रेक’ कमी झाले आहे. 1 जानेवारी 2021 ला ही घटना घडली आहे. 3 ते 8 दिवसात त्याचा प्रभाव महाराष्ट्रात स्पष्ट दिसतोच हे वैज्ञानिक सत्य आहे असे मी निरीक्षणातून नोंदविले आहे. त्यामुळे सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ जाणवत आहे तरी येत्या काळात गोठणार्या थंडीशी आपल्याला जुळवून घ्यावे लागेल.

त्यामुळे आता महाराष्ट्राला नवीन वर्षांची सुरवात करतांना हाडे गोठणार्या कडाक्याची थंडीचा सामना देखील करावा लागणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातही गारठणारी थंडी पडणार आहे. त्या खालोखाल पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीचे तापमान असा ढोबळ मानाने तापमानाचा आलेख असणार आहे. यंदा महाबळेश्वरला पुन्हा एकदा दव गोठून सफेद चादर पहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. तसेच जानेवारी महिन्यात रात्रीच्या वेळी नाशिक येथील निफाडचे तापमान काही कालावधीसाठी शुन्य अंश सेल्सिअसला घसरलेले देखील दिसून येऊ शकते.

*द्राक्षांना तडा जाण्याची शक्यता!*

उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे पिक घेतले जाते. साधरण: ५ अंशाच्या खाली तापमानात घट झाल्यानंतर द्राक्षाला तडा जाण्याची अधिक भिती असते. याशिवाय धुके आणि दव याचाही धोका असतो. राज्यात थंडीची घाट येणार असल्याने तोडणीला आलेल्या द्राक्षांना तडा जाण्याची भिती आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी युद्ध पातळीवर द्राक्षांची तोडणी, विक्री आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. जेणे करून नुकसान टाळता येईल. अन्यथा तीस टक्के ते सत्तर टक्के एवढे द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम थेट द्राक्ष निर्यातीवर होऊन महाराष्ट्र व एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. विशेषतः उत्तर महाराष्ट्राला व पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष पिकाला हा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या शहरात कडाक्याची थंडी
पुढील काही दिवसात राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात घट होणार आहे. यामध्ये मुंबई १२ अंशाच्या खाली तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. तर पुणे- ७, नाशिक-५, औरंगाबाद- ७, नागपूर- ६, लातूर- ८, कोल्हापूर, सातारा, सांगली- १० तर परभणी जिल्ह्याचे तापमान ५ अशांपर्यंत खाली जाण्याची दाट शक्यता आहे.
—-
* ’हेल्थ अलर्ट’!*

राज्यातील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि विशेष करून लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हृदरोग, मधुमेह, दमा, अस्थमा आदी आजार

असल्याने नागरिकांनीही थंडीपासून आपला बचाव करीत खबरदारी घ्यायला हवी. थंडीत नागरिकांनी आहारविहार योग्य वेळेवर घ्यावा. थंडीने त्रास झाल्यास घाबरून न जाता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

*रब्बी पिकांना फायदा!*

राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बी पिकांची पेरणी मोठ्या क्षेत्रावर झाली आहे. रब्बी पिकांना थंडी अधिक फायद्याचे

असते. त्यामुळे ही थंडी गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना फायद्याचे ठरेल.

*कांदा उत्पादन वाढणार!*

कांद्याचे उत्पादन हे दिड ते दोन पट वाढू शकते.

-*प्रा किरणकुमार जोहरे*
-भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -