घरफिचर्समनातले आकार

मनातले आकार

Subscribe

गोलाच चित्र फळ्यावर काढून त्या प्रश्नाला जोड दिली आणि अपेक्षित उत्तराची वाट पाहत असताना एक छोटूल्या जोरात ओरडला रोटी, मग एक छकुली उत्तरली, नही ये तो साफ है? पुरी है क्या? चांदी की कटोरी? लड्डू, जलेबी ....अशी असंख्य खाद्यपदार्थांची यादीच समोर आली. टचकन पाणीच आले डोळ्यात माझ्या.....आपल्या सुसंस्कृत, शाळा शिकलेल्या मुलाचं घोटीव, गुळगुळीत झालेलं उत्तर मिळालच नाही.

आकार येतो संस्काराने, आकार येतात जाणीवेने, का असतात हे आकार? कुठून तयार होतात? कसे घडतात? शालेय शिक्षणात आपल्याला यांची ओळख होतेच, पण त्याही आधी ते असतातच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. आपल्या निरीक्षणातून, जडणघडणीतून तयार होतात काही आडाखे ज्याचा आधार घेऊन मेंदू ठेवत असतो नोंद सगळ्या निरीक्षणांची.

लहानपणीचा खेळ आठवतोय का ढगातील आकार शोधायचा? प्रत्येकाला दिसत असतात निरनिराळे प्राणी, पक्षी, चेहरे असं बरंच काही वेगवेगळं. शाळेत जाऊन पुस्तकी शिक्षण घातलेली मुले आणि शाळाबाह्य असलेली मुले दिसायला सारखीच गोंडस आणि निष्पाप असतात. शालेय शिक्षणाची धार प्रत्येकास हवीच तसं असायलाच हवंय. प्रत्येक मुलाचा तो हक्क असतो. दोन्ही प्रकारच्या मुलांसोबत काम करताना माझ्या अवकाशाचा आकार नक्कीच विस्तारत आहे.

- Advertisement -

एका सामाजिक संस्थेच्या शिबिरात जिथे कचरा वेचणारी, रस्त्यावरच राहणारी शाळेचं तोंडही न बघितलेली मुले सहभागी होती. वेगवेगळ्या आकाराचे ज्ञान मुलांना किती आहे ते चाचपडून पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे मी त्यांना सोपे प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रत्येक आकाराची एक वस्तू सांगा. गोलाच चित्र फळ्यावर काढून त्या प्रश्नाला जोड दिली आणि अपेक्षित उत्तराची वाट पाहत असताना एक छोटूल्या जोरात ओरडला रोटी, मग एक छकुली उत्तरली, नही ये तो साफ है? पुरी है क्या? चांदी की कटोरी? लड्डू, जलेबी ….अशी असंख्य खाद्यपदार्थांची यादीच समोर आली. टचकन पाणीच आले डोळ्यात माझ्या…..आपल्या सुसंस्कृत, शाळा शिकलेल्या मुलाचं घोटीव, गुळगुळीत झालेलं उत्तर मिळालच नाही.

चेंडूच नाही जिथे खेळायला, बांगडी नाही हातात सरकवायला, चंद्र दिसतो उघड्या डोळ्याने मातीत लवंडताना… मग शाळेतला अनुभवच नसताना यांच्या आकारच्या कल्पना कशा मजबूत होत्या तर भुकेचा डोंब पोटात उठतो तिथून येणार्‍या गोष्टीशीच त्यांचा संपर्क येत असतो. चौकोनी पतंग, खिडकी, झोपडी, तर भिंतीवरचा रंगवलेला कुटुंब नियोजनाच्या जाहिरातीतला लाल त्रिकोण अशी जिवंत उदाहरणे चित्रातून व्यक्त होत होती. एका वेगळ्याच दुनियेच मला दर्शन झाले. खूप मोठ्ठं विदारक वास्तव नजरे समोर आ करून उभ राहिलं. सत्य परिस्थितीच वास्तव दखवणार्‍या कारंजात ही मुले रोजच न्हाऊन निघत होती, पण आकार पाठ सोडतच नव्हते. आपल्या सोबत असणारे हे आकार जन्मभर आपल्याला वाट दाखवत असतात.

- Advertisement -

आज आपल्या मुलाच्या भविष्याला आकार देण्यासाठी चाललेली पालकांची धडपड पाहून त्यांच्या शैक्षणिक आराखड्याचा चढता आलेख फारच महत्वाचा ठरतो. घराघरातून धडपडणारे पालक आणि झापातल्या सारखी अभ्यासाला जुंपलेली मुले सर्वत्र पाहायला मिळतात. सतत निरनिराळ्या परीक्षा, शारीरिक कष्ट, बुद्धीला ताण, ऑल राउंडर होण्याच्या धडपडीत तब्येतीची हेळसांड तर होत नाही म्हणून तळमळणार्‍या माता मुलांना 2, 3 खाऊचे डबे देऊन आपले इतिकर्तव्य पार पडतच असतात.

अपेक्षांच्या यज्ञात बालपणाची आहुती द्यायची बालकांची आणि पालकांची स्वप्ने साकारायची ?

पालकांच्या अधुर्‍या स्वप्नांना मुलांच्या रूपाने नवा बहर येतो. येनकेन प्रकारे ते स्वप्न साकार करायचेच. त्याचा प्रवास योग्य पद्धतीने व्हावा तर चिकाटी व प्रयत्न हवेच. कष्ट उपसण्याची तयारी सुद्धा हवीच. संयम बाळगावा लागतोच, आपल्या पाल्याचा कल, आवड निवड व गती बघूनच ते ठरवावे.

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी…तुच घडवीशी,
तुच फोडीशी, कुरवाळीशी तु, तुच तोडीशी….

उमलणार्‍या कळ्यांना जबरदस्तीने लवकर फुलवण्याचा प्रयत्न केल्यास त्या खुरडतात, सुकतात व मान टाकतात. त्यापेक्षा पालकरूपी झाडावरील कळ्या योग्य पद्धतीने पोषण होऊनच फुलू द्याव्यात. ही आपली व्यक्तिगत व सामाजिक जबाबदारी समजूनच वागले पाहिजे. आपल्या देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी चांगले नागरिक घडले पाहिजेत, यातच सगळ्यांचे हित दडले आहे. एक कसदार व्यक्तिमत्व घडल्यवस्च क्रांती घडू शकते. घरोघरी चांगल्या संस्कारातून निपजलेल्या युवा पिढीतूनच नवीन प्रगल्भ समाज आकारास येतो.

-अर्चना देशपांडे जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -