घरफिचर्सकोकणातील निसर्गरम्य पर्यटन

कोकणातील निसर्गरम्य पर्यटन

Subscribe

अगदी लो बजेटमध्येदेखील तुम्ही कोकण फिरू शकता असं म्हटलं तर काहीही वावगं ठरू नये. कारण रात्रीचा प्रवास केल्यास तुमचा हॉटेलचा खर्च सहज वाचतो. आजच्या भागात आपण पाहूया रत्नागिरी शहरापासून काही पाहता येण्याजोगी जवळची ठिकाणं.

पर्यटन म्हटलं की फिरण्याला आजकाल कोकणला जास्त प्राधान्य दिलं जातं. स्वर्गाहून सुंदर असं म्हणत आज कोकणातील पर्यटन वाढताना दिसतंय. एकदा कोकणात गेलेल्या पर्यटकांच्या मनावर झालेलं ते गारूड, ती मोहिनी उतरण्याचं नावच घेत नाही. तसं पाहिलं तर कोकणात गेल्यावर वन डे रिटर्न येता येईल का? याचा आराखाडा प्रत्येकाच्या मनात असतो. अगदी लो बजेटमध्येदेखील तुम्ही कोकण फिरू शकता असं म्हटलं तर काहीही वावगं ठरू नये. कारण रात्रीचा प्रवास केल्यास तुमचा हॉटेलचा खर्च सहज वाचतो. आजच्या भागात आपण पाहूया रत्नागिरी शहरापासून काही पाहता येण्याजोगी जवळची ठिकाणं.

रत्नागिरी स्टेशनच्या आसपास तुम्हाला फ्रेश होण्यासारखे अनेक पर्याय आहेत. शिवाय रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर स्त्री आणि पुरूषांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था आहे. स्टेशनला तर तुम्ही लवकर उतरलात तर दिवसभरामध्ये अनेक बीच फिरता येतात. शिवाय आसपास असलेली गणपतीपुळे, मालगुंड, आरे, वारे बीच, पावसला असलेले स्वामी स्वरुपानंदांचा मठ अशा अनेक ठिकाणी तुमचं मन रमून जाईल. दिवस केव्हा मावळेल हे कळणार नाही. जेवण, नाश्त्यासाठी अनेक घरगुती खाणावळीचे पर्याय तुम्हाला सहज उपलब्ध होतील. रत्नागिरीमध्ये असलेला थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला समृद्ध अशा इतिहासाची साक्ष देतात. शिवाय तुम्ही लोकमान्य टिळकांच्या जन्मगावी भेट देऊ शकता. तुम्हाला जर काही साहसी क्रीडा प्रकार करायचा असेल तर स्कुबा डायव्हिंगचा पर्याय आहे. जेणेकरून तुम्ही समुद्राखालील जीवन अनुभवू शकता. होली क्रॉसिंगसारखे कॅम्प येथे आयोजित केलेले असतात. संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही बीचला जात मन प्रसन्न करू शकता. त्यानंतर रात्रीच्या प्रवासाला सुरूवात करायला काहीच हरकत नाही.

- Advertisement -

आता हो, एक दिवसामध्ये हे सर्व फिरताना तुमची घाई होईल. पण मजा येईल. त्याशिवाय मार्लेश्वरसारखे स्थळ आहे. पण त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ काढाला लागेल. हे सारं वाचल्यानंतर तुम्हाला कोकणात जायचा मोह आवरला नसेल ना? तर मग वाट कसली पाहताय? चला तर या कोकणात फुल टू धम्माल करायला.

कोकणातील प्रत्येक ठिकाणांचा आढावा आपण या सदरात घेणार आहोत. पण आज इथेच थांबूया. पुढच्या वेळी नक्की भेटू कोकणातील काही पर्यटनस्थळांच्या माहितीसह. तोवर तुम्ही बॅग भरायला घ्या. कारण कोकणातील पर्यटन स्थळांबद्दल वाचल्यानंतर तुमची घाई होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -