कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: कोविड योध्यांना ‘मानाचा मुजरा’

ganesh decoration at home by sanjay karande

कल्याण येथे राहणारे कारंडे कुटुंबियांनी यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा कारंडे कुटुंबियांनी कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोरोना योद्धांना देखावा समर्पित केला आहे. तसेच त्यांनी शाडू मातीची मूर्ती पुजली आहे. संजय कारंडे हे गेले ५४ वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांच्या घरी गणपती बाप्पा हा पाच दिवसांचा असतो.

सजावटीसाठी लागणारे साहित्य

हा इको फ्रेंडली देखावा तयार करण्यासाठी त्यांनी कागद, पुठ्ठे, जुने कपडे आणि जलरंग इत्यादीचा वापर केला आहे.

काय आहे देखावा?

या देखाव्यात कोरोना योद्धा दाखवण्यात आले असून यामध्ये पोलीस, शेतकरी, सफाई कामगार, यांत्रिक, चालक, लालपरी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, परिचारीका, बँक कर्मचारी यांचे फोटो लावण्यात आले आहे. तसेच आपण सर्वांनी मिळून कोरोनाला हरवू या, असे आवाहन करण्यात आले आहे.