राशिभविष्य : शुक्रवार, १२ जुलै २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- आजच्या दिवसात धावपळ जास्त होईल. दुसर्‍याने केलेली चूक तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.
वृषभ :- तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण होईल. जिद्द ठेवा. धंद्यात चांगली संधी मिळेल. पाहुणे येतील.
मिथुन :- तुम्ही ठरविलेल्या कामात अचानक बदल करण्याची वेळ येऊ शकते. खर्च वाढेल.
कर्क :- मुले, जीवनसाथी यांच्याशी संवाद साधताना वाद निर्माण होऊ शकतो. संयम ठेवा.
सिंह :- वाहनांपासून मनस्ताप होऊ शकतो. वाहनाचा वेग कमी ठेवा. अचानक एखादी व्यक्ती भेटेल.
कन्या :- महत्त्वाची कामे करा. वाईट संगतीतून बाहेर पडता येईल. जिद्द ठेवा.
तूळ :- धंद्यात लक्ष देता येईल. नविन लोकांची ओळख होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक :- सकाळी क्षुल्लक वाद संभवतो. त्यानंतर तुमची कामे होतील. शेअर्स अंदाज नीट घ्या.
धनु :- दुसर्‍यांना मदत करावी लागेल. दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. रस्त्याने सावधपणे चाला.
मकर :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. कायद्याचे कामात वेळच्या वेळी लक्ष द्यावे लागेल.
कुंभ :- आप्तेष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. स्पर्धेत आकर्षण वाढेल.
मीन :- कठीण काम करून घ्या. धंद्यात लक्ष द्या. छोटासा वाद वाढवण्याची गरज नाही.