आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष :- कामाचा व्याप वाढल्यामुळे थकवा जाणवेल.खाण्याची व औषधाची वेळ नीट सांभाळा.दगाफटका याकडे लक्ष द्या.

वृषभ :- जीवनसाथीची मर्जी राखता येईल.जुनी थकबाकी वसूल करा. विचारांना चालना मिळेल. मोठ्या लोकांचा संपर्क वाढेल.

मिथुन :- अचानक अडचणी आल्याने ठरविलेले काम पूर्ण होणे कठीण होऊ शकते. कामाचा व्याप व ताप होईल. नम्रता ठेवा.

कर्क :- प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल. मदत घेता येईल. घरातील माणसांचे विचार उपयोगी पडतील.

सिंह :- ताणतणाव वाढेल. ज्येष्ठ व्यक्तींच्या बरोबर मतभेद वाढू शकतात. वाडवडिलांची मर्जी राखावी लागेल.

कन्या :- जुना वाद मिटवण्याचा प्रयत्न करू शकाल. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल. खरेदी होईल.

तूळ :- अपेक्षित कामे पूर्ण होऊ शकतील. सबुरी ठेवा. धंदा मिळेल. नवीन ओळखीचा फायदा होईल.

वृश्चिक :- मनातील विचार बोलून दाखवणे गरजेचे आहे. गैरसमज मिटवा. सर्व कामे वेळेवर पूर्ण करा.

धनु :- वेळ फुकट जाऊ शकतो. नकळत चूक होईल. नको असलेली व्यक्ती तुमचा महत्त्वाचा वेळ घेईल.

मकर :- आजचे काम आजच करा. मुलांच्या बरोबर वेळ मजेत जाईल. प्रवासाचा बेत ठरवाल. पाहुणे येतील.

कुंभ :- प्रश्न सोडवण्याचा मार्ग मिळू शकेल. वरिष्ठांची काळजी वाटेल. घरात वेळ द्यावा लागेल. स्पर्धा कठीण ठरेल.

मीन :- अडचणी दूर होतील. नव्या उमेदीने धंदा करता येईल. मालाची विक्री मनाप्रमाणे होईल. पाहुणे येतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here