राशिभविष्य : मंगळवार, ६ ऑगस्ट २०१९

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष : सकाळचा तणाव कमी होऊ शकेल. लंच नंतर विचारांना चालना मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल.

वृषभ : सकाळचा उत्साह दुपारनंतर कमी होऊ शकतो. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. प्रयत्नानेच यश मिळवा.

मिथुन : आत्मविश्वासाने तुम्ही कठीण काम करून दाखवाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धा जिंकाल.

कर्क : वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कला-क्रीडा साहित्यात प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाला चालना मिळेल.

सिंह : दादागिरी न करता वागल्यास तुमचे काम होईल. दुपारनंतर आशेचा किरण दिसेल. जिद्द ठेवा.

कन्या : प्रगतीचा मोठा मार्ग तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मिळेल. नविन ओळख होईल. धंद्यात फायदा होईल.

तुला : सकाळी झालेला वाद दुपारनंतर मिटवता येईल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

वृश्चिक : कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. तुमचा अंदाज मागे-पुढे होऊ शकतो. घाई करू नका.

धनु : अडचणीत आलेले काम करून घेता येईल. कामाचा व्याप असला तरी मदत घेता येईल.

मकर : महत्त्वाची कामे आजच करण्याचा प्रयत्न करा. घरातील वाटाघाटीत यश मिळेल. धंदा वाढवा.

कुंभ : पोटाची तक्रार निर्माण होऊ शकते. खाण्याची काळजी घ्या. कामाचा व्याप नोकरीत वाढेल.

मीन : सकाळचा उत्साह दुपारनंतर कमी होऊ शकतो. प्रवासात घाई करू नका. दुखापत संभवते.