राशीभविष्य : शनिवार, १८ जानेवारी २०२०

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष : महत्त्वाची रेंगाळलेली कामे होतील. उत्साह वाढेल. नाराज झालेल्या व्यक्तींना खुष करता येईल. धंदा वाढेल. वसूली करी.

वृषभ : अडचणी येतील त्यामुळे काम करतांना मेहनत घ्या, जिद्द ठेवा. धंद्यात कामे मिळतील. रागावर ताबा ठेवा.

मिथुन : कामातील अडचणी कमी होतील. अरेरावी करू नका. महत्त्वाचा निर्णय घेताना सर्वांचा विचार करा. नम्रपणे बोला.

कर्क : निष्कारण वाद वाढवू नका. तुमचा विचार पटवून देता येईल. धंद्यात वाढ करू शकाल. कठीण काम करा.

सिंह : सर्वांचे सहाय्य घेता येईल. मोठ्यांचा मान राखा. अनुभवी माणसांचा सल्ला उपयोगी येईल. मैत्री होईल.

कन्या : धंद्यात वाढ होईल. भागिदाराच्या बरोबर चर्चा होईल. गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. प्रभाव पडेल.

तूळ : मनाची द्विधा अवस्था होईल. अनेक काम करण्याचा प्रयत्नक थोडा त्रासदायक ठरेल. वेळेनुसार निर्णय घ्या.

वृश्चिक : खर्चावर बंधन घाला. नवीन काम मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठांची मदत मिळेल. राग वाढवू नका.

धनु : तुमचा निर्णय अचूक ठरेल. जुने मित्र भेटतील. धंद्यात फायद्याचे काम मिळेल. चर्चा यशस्वी होईल.

मकर : तुमच्या कामात तुम्ही तत्परता दाखवा. प्रभाव पडेल. स्पर्धा जिंकता येईल. ओळखी वाढतील. वसूली करा.

कुंभ : जवळची माणसे कामाचा गोंधळ करतील. तुमचे विचार योग्य ठरेल. मौज-मजा कराल. सल्ला कमीच द्या.

मीन : पोटाची काळजी घ्या. मौल्यवान वस्तु सांभाळा. नविन ओळख झाली तरी मोहात पडू नका. सावध रहा.