Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य मंगळवार,७ जुलै २०२०

राशीभविष्य मंगळवार,७ जुलै २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- मुलांनी सांगितलेला फंडा तुम्हाला चर्चेत उपयुक्त ठरू शकतो. जवळच्या माणसांना सांभाळून ठेवा.

वृषभ ः- विचारांना दिशा मिळेल. कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. वेळेला महत्त्व द्या. मैत्री वाढेल.

मिथुन ः- दुसर्‍यांना त्रास देणारा माणूस स्वार्थी वृत्तिचाच असतो. तुमचे काम पूर्ण होईल. धंदा वाढेल.

कर्क ः- मनाचा तोल सावरता येईल. मनमानी करण्यापेक्षा सत्यपरिस्थितीनुसार निर्णय घ्या.

सिंह ः- दडपण कमी होईल. वाहन जपून चालवा. नविन ओळख होईल. धंद्यात लक्ष द्या.

कन्या ः- तुमच्यावर आरोप येईल. शांतपणे विचार करा. प्रश्न मोठा असेल असे नाही.जवळच्या माणसांना सांभाळून ठेवा.

तूळ ः- आप्तेष्ठांची भेट होईल. तुमचे बोलणे परिस्थितीला धरून असल्याने तुमचा प्रभाव वाढेल.

वृश्चिक ः- विरोधात बोलणार्‍या माणसांच्यावर रागावण्यापेक्षा त्याचा खरोखर विचार करा. सुधारणा करा.

धनु ः- तणाव कमी होईल. मार्ग मिळेल. तुमचा सर्वांना अभिमान वाटेल. नवे परिचय होतील.

मकर ः- स्वतःच्या प्रकृतिची काळजी घ्या. तुमचा विचार चांगला असला तरी लोक टिका करतात. शांत रहा.

कुंभ ः- संसारात शुभ समाचार मिळेल. गैरसमज दूर होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

मीन ः- अडचणीवर मात करून पुढे जावे लागेल. प्रेमाची माणसे तुमचा मान ठेवतील. खंबीर रहा.