घरभविष्यजाणुन घ्या राशीभविष्य - ५ ते ११ ऑगस्ट

जाणुन घ्या राशीभविष्य – ५ ते ११ ऑगस्ट

Subscribe

राशीभविष्य ५ ते ११ ऑगस्ट

मेष ः-

चंद्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. धंधात संधी मिळेल. पैसा गुंतवतांना मात्र चौकशी करा. फसगत टाळा. संसारात जीवनसाथी, मुले यांची तुमच्यावर नाराजी होऊ शकते. खर्च वाढेल. नातलगांसाठी वेळ, पैसा खर्च होईल. राजकीय-सामाजिक कार्याला तुमचा उत्साह नेहमीच असला तरी लोकांचे, नेत्यांचे मत घेऊनच पुढे जावे लागेल. विलंबाने सर्व घटना घडत आहेत असे तुम्हाला वाढेल. कोर्ट केस मध्ये सावध रहा. मनाचे सामर्थ्य टिकून राहिल. कला-क्रिडा क्षेत्रात मेहनत तुमचा लागेल. नोकरी, संशोधन कार्यात तुमचा बरोबर असला तरी वरिष्ठ ते मान्य करतील असे मानू नका. शुभ दि. ६,४

वृषभ ः-

शुक्र मंगळ, त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. कटकटी, अडचणी असल्या तरी धंधात लक्ष द्या. कष्ट घ्या. फायदा होेईल. संसारातील वाद मिटवण्याची संधी सोडू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्या. कायदा मोडू नका. नोकरीत स्थिरता आणता येईल. कोर्टकेस मध्ये योग्य सल्याने बोला. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगतिची संधी मिळेल. कल्पना शक्ती वाढेल. संशोधन कार्याला दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे. मोठी खरेदी सावधपणे करा. शुभ दि. ८,९

- Advertisement -

मिथुन ः-

चंद्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा राग वाढेल अशी घटना घडू शकते. वाहन जपून चालवा. राजकीय- सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा, अधिकार वाढण्याची संधी मिळेल. धंधात मोठी ऑफर समोरून येईल. शेअर्स मध्ये फायदा होईल. नोकरीत चांगला बदल करू शकाल. कंपनी द्वारा परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रिडा क्षेत्रात पुरस्कार व लाभ मिळेल. कोर्टकेस कशापद्धतीने लवकर संपवता येईल याचा विचार करा. संशोधन कार्यात मोठे यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने बुद्धिचा वापर करून उत्तम यश मिळवावे असे ग्रह आहेत. शुभ दि. ९, १०

कर्क ः-

सूर्य बुध युति, शुक्र शनि केंद्र योग होत आहे. घरातील ताण, तणाव कमी होऊन, आनंदाचा प्रसंग अनुभवाल. मनावरील दडपण कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढवता येईल. बुधवार, गुरुवार संयमाने तुमची भूमिका मांडा, वाहन जपून चालवा. नोकरीतील कामात तुसहयता येईल. धंधात सुधारणा होईल. कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नविन ओळख फायद्याची ठरेल. संशोधन कार्यातील अडचणीवर मात करता येईल. जमिनी संबंधी कामे करता येईल. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेऊन अभ्यास पूर्ण लक्ष द्यावे. शुभ दि. ५, ६

- Advertisement -

सिंह ः-

बुध, प्लुटो बडाष्टक योग, चंद्र मंगळ त्रिकोणयोग होत आहे. राजकीय सामाजिक कार्यात तुमचे वाढलेले प्रस्थ इतरांना सहन होणार नाही. गुप्तकारवायांचा त्रास शुक्रवार, शनिवार होईल. घरातील मतभेद आर्थिक करारातून होऊ शकतात. धंधात समस्या येईल. कामगार कमी पडतील. वाटाघाटीत नाराजी होऊ शकते. कोर्ट केस मध्ये मुद्याचे न बोलल्यामुळे अडचणी येऊ शकतात. कला-क्रिडा क्षेत्रात मतभेद, वाद होऊ शकतो. तुमचे महत्व टिकवण्यासाठी मेहनत ध्यावी लागेल. नोकरीत, संशोधन कार्यात वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तुमची जिद्द व नम्रता यामुळे प्रतिष्ठा राखता येईल. शुभ दि. ५, ८

कन्या ः-

शुक्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य, बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अत्यंत मोठो निर्णय याच सप्ताहात घ्या. लोकप्रियता टिकवून ठेवा. धंधात कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करा. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत बदल होऊ शकेल. घरात शुभ समाचार मिळेल. संमंतीची प्रगति कौतुकास्पद ठरेल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. नविन मोठ्या लोकांची ओळख तुम्हाला उन्नती करून देणारी असेल. कोर्ट केस मध्ये सरशी होईल. संशोधन कार्याला वेग येईल. मनाप्रमाणे यश मिळवता येईल. धाडस करा परंतू कायदा पाळा. विद्यार्थी वर्गाला योग्य दिशेने जाता येईल. परदेशात जाता येईल. शुभ दि. ७, ८

तूळ ः-

शुक्र मंगळ त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. संसारात ओढताण होईल. मानसिक दडपण येईल. खाण्यापिण्यामध्ये चंगळ केल्यास प्रकृति बिघडू शकते. राजकीय-सामाजिक कार्यात नियमितपणा ठेवा. वरिष्ठांच्या संपर्कात रहा. जवळचे लोक तुमचा हेवा करतील. नोकरीत दुसर्‍यावर जास्त विश्वास ठेऊ नका. धंधात कामगार किंवा अतिविश्वासातला माणूस यावर आर्थिक जबाबदारी टाकू नये. कला-क्रिडा क्षेत्रात यश मिळेल. परंतू आपसांत मतभेद होऊ शकतात. कोर्ट केस मध्ये खर्च वाढू शकतो. संशोधन कार्यात आळस नको. बुद्धिचातुर्य वापरा. व्यसन व विरुद्धलिंगी व्यक्तीचा मोह यात वेळ फुकट जाईल. शुभ दि. ८, ९

वृश्चिक ः-

सूर्य चंद्र लाभयोग, शुक्र मंगळ त्रिकोण योग होत आहे. तणावाखाली राहिल्यास धंधात योग्य निर्णय घेता येणे कठीण होेईल. घरात अस्थिरता वाटेल. राजकीय-सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार वाद विकोपाला जाऊ शकतो. साडेसाती सुरू आहे. विचार विनियम करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. नोकरीत वर्चस्व राहिल. कामांना गती मिळेल. कोर्ट केस मध्ये प्रसंगानुरूप वागा. अडचणीवर मात करता येईल. संशोधन कार्यात स्वतःचे विचार पटकन व्यक्त न करता काम करा. विद्यार्थी वर्गाने चालढकलपणा करू नये. सातत्याने अभ्यास करावा. शुभ दि. ६, १०

धनु ः-

बुध प्लुटो बडाष्टक योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला वेगळ्याच प्रकारचे अनुभव येतील. स्वतःच्या स्थानाबद्दल अस्थिरता निर्माण होऊ शकते. तुमचे स्पष्ट बोलणे वादग्रस्त ठरू शकते. धंधात समस्या येईल. कायदा समजून त्यानुसार करार करा. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला दूर करण्याचा प्रयास मोठे लोक करू शकतात. कला-क्रिडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. जिद्द ठेवा. नोकरीत वाकड्या वाटेने कोणताहि निर्णय घेऊ नका. कोर्टाच्या कामात अडचणी वाढतील. विद्यार्थी वर्गाने ध्येय महत्वाचे मानून अभ्यास करावा. शुभ दि. 8,9

मकर ः-

मकर साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. शुक्र मंगळ, त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. लोकांच्या नजरेत तुमचे कार्य भरेल असेच काम करा. धंधात वाढ होईल. भागीदार मिळतील. नोकरीतील तणाव कमी होईल. कुटुंबातील समस्या सोडवता येईल. कोर्टकेसमध्ये बुधवार, गुरुवार सावध रहा. योग्य मुद्दे मांडता येतील. कला-क्रिडा क्षेत्रात प्रभाव दिसेल. घर, वाहन, जमिन खरेदी होऊ शकेल. संशोधन कार्याला गती मिळेल. कोणतेही महत्वाचे काम लवकर पूर्ण करा. परिक्षेत पुढे जाता येईल. शुभ दि. 6,7

कुंभ ः-

सूर्य नेपच्यून बडाष्टक योग होत आहे. चंद्र मंगळ प्रतियुति होत आहे. नोकरीच्या ठिकाणी दबावाखाली येऊन भलताच निर्णय घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही घेतलेला पुढाकार काही लोकांच्या पोटात दुखेल. नाराजी तुमच्यावर होईल. गुप्त कारवायांचा त्रास होईल. धंधात घात होण्याची शक्यता असल्याने उतावळेपणा नको. कोर्टाच्या केसमध्ये चिंताजनक वातावरण होईल. कला-क्रिडा क्षेत्रात कष्ट घ्या. प्रगतिची संधी त्यामुळेच पुढे मिळू शकेल. संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. घरात दडपण राहिल. स्वतःच्या प्रकृतिची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. परिक्षेसाठी संपूर्ण तयारी करा.

मीन ः-

सूर्य चंद्र लाभयोग, शुक्र, मंगळ त्रिकोणयोग होत आहे. या सप्ताहात धंधात जम बसेल. मागील येणे वसूल करा. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. राजकीय-सामाजिक कार्यात मिळेल ती संधी घेऊन कार्याचा विस्तार करा. लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरी लागण्याची शक्यता आहे. श्री साईनाथांचा जप करा. प्रयत्न व जिद्द यामुळेच कोणतेहि कार्य करण्याची शक्ति मिळते. कला-क्रिडा क्षेत्रात यश मिळेल. जीवन परिचय होईल. संशोधन कार्याला योग्य वळण मिळेल. याच सप्ताहात मोठे काम करून घ्या. कोर्टाच्या कामात सहाय्य मिळेल. परिक्षेसाठी मेहनत घेतल्यास चांगले यश मिळेल. शुभ दि. ६, १०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -