घरIPL 2020IPL मध्ये रैना, हरभजन सिंग CSK विरोधात खेळताना दिसणार

IPL मध्ये रैना, हरभजन सिंग CSK विरोधात खेळताना दिसणार

Subscribe

आयपीएल २०२० सुरु होण्याआधीच काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचे दोन दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी हा हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही यासाठी वैयक्तिक कारणे सांगितली होती. यानंतर, CSK ने त्यांच्या वेबसाइटवरून दोन्ही खेळाडूंची नावे काढून टाकली. फ्रँचायझीने आता त्यांच्या विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. CSK ने दोन्ही खेळाडूंशी करार संपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आयपीएलच्या लिलाव मार्गदर्शक तत्त्वांनुसार, २०१८ मध्ये हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी CSK बरोबर तीन वर्षांचा करार केला होता, जो २०२० मध्ये संपुष्टात आला होता. तथापि, या दोन्ही खेळाडूंनी या हंगामात खेळण्यास नकार दिला. फ्रँचायझीने पुढचे पाऊल उचलत अधिकृतपणे दोघांसोबतचा करार संपविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश रैनाने एक वर्षासाठी ११ कोटींच्या करारावर स्वाक्षरी केली होती, तर हरभजन सिंगने २ कोटींच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

- Advertisement -

यावर्षी दोन्ही खेळाडूंना करारानुसार मानधन दिले जाणार नाही. या दोघांसोबतचा करार संपुष्टात येण्याच्या विषयावर एका वेबसाइटने CSK फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला. या खेळाडूंना पगार दिला जाईल का असे विचारले असता त्यांनी हे स्पष्ट केले की खेळाडू जेव्हा खेळतील तेव्हाच त्यांना पैसे दिले जातील. जे खेळत नाहीत त्यांना पैसे दिले जाणार नाहीत.

रैना आणि हरभजन सिंग यांचा CSK बरोबर २०२० पर्यंत करार होता. जर फ्रँचायझी त्यांच्याशी केलेला करार संपुष्टात आणत असेल तर त्याचा दोघांवर खूप वाईट परिणाम होईल. कदाचित पुढील वर्षी वेळ नसल्यामुळे बीसीसीआय खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन करू शकणार नाही. अशा परिस्थितीत रैना आणि भज्जी यांचा CSK बरोबर कोणताही करार होणार नाही आणि २०२१ च्या आयपीएल हंगामाला मुकावे लागेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -