घरलाईफस्टाईलसॅनिटरी नॅपकीन वापराचा महिलांमध्ये अभाव

सॅनिटरी नॅपकीन वापराचा महिलांमध्ये अभाव

Subscribe

सॅनिटरी नॅपकीनबाबत जनजागृती होत असतानाच अजूनही काही महिलांमध्ये याचा अभाव आहे. मासिक पाळीचे आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व या विषयाबाबत किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवून एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मदरहूड हॉस्पिटल्स या भारतातील सर्वात वेगाने विस्तारित होणाऱ्या महिला व बाल रुग्णालयाने स्फेरुल फाउंडेशन (महिला सबलीकरण व आरोग्य या संदर्भातील विकास व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी काम करणारी एनजो) या संस्थेच्या सहयोगाने मासिक पाळीचे आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व या विषयाबाबत किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवून एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी केंद्रीय विद्यालयात उपस्थित असलेल्या सुमारे १७०० लोकांशी मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेचे महत्त्व, गृहितके, गैरसमज या संदर्भात ३८ मिनीट ८ सेकंदाचा संवाद साधला. या संयुक्त उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. मासिक पाळीसंदर्भातील आरोग्य व स्वच्छता या विषयी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी किशोरवयीन मुली, मुलगे, पुरुष आणि महिला सर्वाधिक संख्येने उपस्थित होत्या.

८२ टक्के महिला करतात पर्यायी उपाय

मासिक पाळी असलेल्या भारतातील ३५५ दशलक्ष महिलांपैकी केवळ १८% महिला सॅनिटरी नॅपकीन्सचा वापर करतात आणि सॅनिटरी नॅपकीन न परवडणाऱ्या ८२% महिला वर्तमानपत्रे, माती, पाने, चिखल किंवा निर्जंतुक न केलेली फडकी/चिंध्या अशा आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ असलेल्या पर्यायांचा वापर करतात. त्यामुळे खाज येणे, जळजळ, योनीमार्गाला व मूत्रमार्गाला होणारा संसर्ग, वंध्यत्व आणि प्रजननाशी संबंधित आरोग्याच्या इतर आजार होतात.

- Advertisement -

“मासिकपाळीबद्दल जगभरातील मौन आणि लाज ही चिंतेची बाब आहे. एकट्या भारतातच सॅनिटरी नॅपकीनची अनुपलब्धता आणि मासिक पाळीबद्दल नीट माहिती नसल्यामुळे २३ दशलक्ष मुली (दर ५ पैकी १ मुलगी) शाळा सोडतात. मदरहूड हॉस्पिटलसोबत सहयोग करून, मासिक पाळी हा कलंक नाही या वस्तुस्थितीबाबत देशात अधिक खुली विचारसरणी उद्युक्त करण्यासाठी आम्ही एक छोटे पाऊल उचलत आहोत. आपल्या मुलींसाठी मासिक पाळी महत्त्वाची असते आणि सगळ्यांसाठीच आणि सगळीकडे ती महत्त्वाची असते. आम्ही ती अनुभवतो आणि या अनुभवाला एक निश्चित आकार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.” – स्पेरुल फाउंडेशनच्या संस्थापक, डॉ. गीता बोरा 

“किशोरवयीन मुलींना मासिक पाळीची भीती वाटत असते, शंका असतात, गैरसमज असतात. हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये मासिक पाळी आणि मासिक पाळी हा एक स्वागतार्ह बदल आहे या विषयावर मुली, मुलगे, पुरुष आणि महिलांना माहिती देण्यात येते. मासिक पाळीबाबतची शरीरशास्त्राचे माहिती देणे आणि त्यासंदर्भातील गैरसमज दूर करण्याचे काम या उपक्रमातून करण्यात येते. मासिक पाळीतदरम्यान स्वच्छता कशी राखावी आणि या विषयाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यावर भर देण्यासाठी स्फेरुल फाउंडेशनतर्फे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा प्रकारचे उपक्रम ही आजच्या काळाची गरज आहे आणि या उपक्रमामध्ये स्फेरुलसोबत सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.” – मदरहूड हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ, डॉ. राजेश्वरी पवार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -