घरलाईफस्टाईलडाळिंबाच्या सालींपासून घरच्या घरी बनवा माऊथवॉश!

डाळिंबाच्या सालींपासून घरच्या घरी बनवा माऊथवॉश!

Subscribe

तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी बाजारात अनेक माऊथवॉश उपलब्ध आहेत. मात्र त्यामधील केमिकल्स त्रासदायकही ठरू शकतात. म्हणूनच अशा केमिकलयुक्त माऊथवॉशऐवजी घरगुती आणि नैसर्गिक माऊथवॉशचा वापर करा.

तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी बाजारात अनेक माऊथवॉश उपलब्ध आहेत. मात्र त्यामधील केमिकल्स त्रासदायकही ठरू शकतात. म्हणूनच अशा केमिकलयुक्त माऊथवॉशऐवजी घरगुती आणि नैसर्गिक माऊथवॉशचा वापर करा.डाळिंबाची साल ही फळाप्रमाणेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल. अ‍ॅन्टिऑक्सिडंट असते. त्यामुळे डाळिंबाची सालं फेकून न देता त्यापासून माऊथवॉश बनवू शकतो. यामुळे माऊथ अल्सर, दुर्गंधी अशासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. संशोधनानुसार, डाळिंबामधील अ‍ॅन्टीमायक्रोबियल क्षमता या बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत करते. दातांमधील कॅव्हिटी, तोंडाला येणारी दुर्गंधी अशा समस्यांमध्ये या बॅक्टेरियामुळे अधिक चालना मिळते.तसेच डाळिंबाच्या रसामध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव कमी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तोंडाचा कॅन्सर कमी होण्यासाठी मदत होते. तसेच डाळिंबाच्या सालीमुळे किमान १० मिनिटे तोंड स्वच्छ केल्यास लाळीतील पातळीसुद्धा सुधारते.

मग पहा या माऊथवॉशची स्टेप बाय स्टेप कृती -:

मध्यम आकाराच्या डाळिंबाचे चार काप करा. त्यामधील दाणे बाजूला काढा. त्यामधील पिवळी सालदेखील बाजूला काढा. अन्यथा कडवट चव येते.

- Advertisement -

डाळिंबाची सालं काही दिवस थेट सूर्यप्रकाशात ठेवा. यामुळे त्यामधील मॉईश्चर (पाण्याचा अंश) पूर्ण सुकून जाईल.

डाळिंबाची साल पूर्ण सुकल्यावर कडक होईल.सुकलेल्या सालीची अगदी बारीक पावडर करा.

- Advertisement -

२० ग्रॅम डाळिंबाच्या सालींची पावडर एक लीटर पाण्यामध्ये मिसळा. हे मिश्रण काही मिनिटे उकळा. त्यानंतर गाळून ते थंड करा.

त्यानंतर तुम्ही या पाण्याचा वापर माऊथवॉश म्हणून करू शकता.

डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेला माऊथवॉश तुम्ही बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये साठवून ठेऊ शकता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -