रेसिपी : स्वीट ब्रेड

ब्रेडपासून एक स्वीट डिश

स्वीट ब्रेड

बऱ्याचदा आपण ब्रेडपासून सँडविच किंवा ब्रेड रोल केलेले पाहिले आहे. पण, आज आम्ही तुम्हाला ब्रेडपासून एक स्वीट डिश सांगणार आहोत. ते म्हणजे स्वीट ब्रेड.

साहित्य

  • ६-७ ब्रेड स्लाइस
  • गरजेनुसार तेल
  • १ कप साखर
  • अर्धा कप पाणी
  • अर्धा चमचा वेलची पावडर

कृती

सर्वप्रथम ब्रेड एका साईटमध्ये कट करुन घ्यावे. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालून ब्रेड चांगले परतून घ्या. आता दुसऱ्या पॅनमध्ये साखर घालून त्यात पाणी घालून एक दोन उकळी येऊ द्या. त्यात वेलची पावडर घालून पाक तयार करा. त्यानंतर गरम साखरेच्या पाकात ब्रेड स्लाइस डीप करुन सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यावे. अशाप्रकारे स्वीट ब्रेड तुम्ही चहासोबत किंवा लहान मुलांना टिफीनला देखील देऊ शकता.