घरलोकसभा २०१९केंद्र सरकार रयतेचे की उद्योगपतींचे

केंद्र सरकार रयतेचे की उद्योगपतींचे

Subscribe

अमोल कोल्हेंचा घणाघात

शिवरायांचे नाव घेत 2014 मध्ये भाजपचा विजय झाला. जनतेने त्यांना कल्याणकारी राज्य करण्यासाठी निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडच काय तर राज्यातील कोणत्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा परत आणू. या परत आणलेल्या पैशातून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करू, असे आश्वासनही निवडणुकांच्या वेळी सत्ताधार्‍यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला. हे सरकार रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? असा परखड सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या जुन्नरमधील सभेत केला.

कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे मूळ गाव असणार्‍या नारायणगाव येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे हा मेळावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त आयोजनाने पार पडला. पुलवामा हल्ल्यात 42 जवान शहीद झाले. मात्र, एका वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या सरकारच्या काळात 450 जवान शहीद झालेले असताना 56 इंचांची छाती दिसते कशी?, असा खोचक सवाल कोल्हे यांनी मोदींचे नाव न घेता उपस्थित केला. शिवनेरीचा शिलेदार म्हणून 15 वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा न देऊ शकल्याबद्दल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

अमोल कोल्हेंबरोबरच या मेळाव्यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार विलास लांडे, आमदार दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी 1 मार्च रोजी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो लावू नका
छत्रपती संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो फ्लेक्सवर लावू नका, असे आवाहन अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -