धामणगांव रेल्वे विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३६

अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे (विधानसभा क्र. ३६) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

Amravati
Dhamangaon railway assembly constituency
धामणगांव रेल्वे विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३६

धामणगांव रेल्वे विधानसभा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. धामणगांव रेल्वे मतदारसंघाला चांदुर रेल्वे मतदारसंघ म्हणून देखील ओळखले जाते. २०११ च्या जनगननेनुसार धामणगांव रेल्वे मतदारसंघाची लोकसंख्या २,५५,१८८ आहे. या मतदारसंघाची स्थापना २००९ साली झाली. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरेंद्र वाल्मिक जगताप यांचा विजय झाला. त्यानंतर २०१४ साली देखील त्यांचा विजय झाला.

मतदारसंघ क्रमांक – ३६

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४९,९९९
महिला – १,४०,०४७
एकूण – २,९०,०५३

विद्यमान आमदार – विरेंद्र वाल्मिकराव जगताप, काँग्रेस

धामणगांव रेल्वे मतदारसंघाचे विरेंद्र वाल्मिकराव जगताप हे विद्यमान आमदार आहेत. यअगोदरही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. विरेंद्र जगताप हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचे एम. कॉम., बी.एड., एम. फील शिक्षण झाले आहे.

mla virendra jagtap
विद्यमान आमदार विरेंद्र जगताप

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विरेंद्र वाल्मिकराव जगताप, काँग्रेस – ७०,८७१
२) अरुण अडसड, भाजप – ६९,९०५
३) अभिजीत ढेपे, बसपा – २९,२२९
४) सिद्धेश्वर चव्हाण, शिवसेना – १४,१६१


हेही वाचा – अमरावती लोकसभा मतदारसंघ