घरमहा @२८८कळवण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११७

कळवण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११७

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील कळवण (विधानसभा क्र. ११७) विधानसभा मतदारसंघ आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तश्रुंगी देवीचे मंदिर या मतदारसंघात येते. २००९च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहे. गुजरात सीमेवर असलेला सुरगाणा तालुका हा आदिवासीबहूल आहे तर कळवण हा भाग संमिश्र आहे. भाविकांचे श्रद्धास्थान या मतदारसंघात असल्याने भाविकांची गर्दी बाराही महीने या ठिकाणी असते. या मतदारसंघात अनेक आदिवासी जमाती येतात. त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरल्याचे आजवर चित्र आहे.

मतदारसंघ क्रमांक : १७१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : अनुसूचीत जमाती

मतदारांची संख्या

पुरुष : १,३६,५५०
महिला : १,३१,००७
तृतीयपंथी : ०
एकूण मतदान २,६७,५५७

- Advertisement -

विद्यमान आमदार : जिवा पांडू गावित, माकप

माजी मंत्री अर्जुन तुळशीराम पवार यांनी कळवण मतदारसंघात नऊ टर्म आपला गड राखला होता. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये कळवण आणि सुरगणा मतदारसंघ एकत्र झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिवा पांडू गावित यांनी ए.टी.पवार यांचा पराभव केला. गावित हे सुरगाणा मतदारसंघातून पाच टर्म आमदार राहिलेले आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ए.टी.पवार यांच्या स्नुषा भारती पवार ह्या भाजप कडून लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या आहेत. जिल्हा परिषदमध्ये पवार कुटुंबियांचे तीन सदस्य असून यामध्ये ए.टी.पवार यांचे पुत्र नितिन पवार आणि स्नुषा भारती पवार आणि जयश्री पवार यांचा समावेश आहे. यापैकी जयश्री पवार ह्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत.

कळवण विधानसभा मतदारसंघ आमदार जिवा पांडू गावित

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

जिवा पांडू गावीत – माकप -६७,७९५
ए.टी. पवार – राष्ट्रवादी – ६३,००९
यशवंत गवळी – भाजप – २५,४५७


हे ही वाचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -