मेळघाट विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४१

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट (विधानसभा क्र. ४१) विधानसभा मतदारसंघ आहे.

Amravati
melghat assembly constituency
मेळघाट विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४१

मेळघाट मतदारसंघ अमरावती जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग आहे. मेळघाट या शब्दाचा अर्थ ‘घाटांची बैठक’ असा होतो. हिरवेगार निसर्ग आणि घनदाट जंगल आणि डोंगपर्वत यामुळे या भागात बऱ्यापैकी वन्यजीवन आहे. त्यामुळे १९७४ साली या जागेला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले होते. मेळघाट विधानसभा मतदार संघ हा अमरावती लोकसभा मतदार संघाचा भाग आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. आतापर्यंत आठ वेळा काँग्रेसचेच उमेदवार मेळघाटात जिंकून आले आहेत. तर भाजपलाही चार वेळा या मतदारसंघात जिंकता आलेले आहे. सध्या भाजपचे प्रभुदास बाबुलाल भिलावेकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ४१

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,३५,३२२
महिला – १,२२,१५५
एकूण – २,५७,४७९

विद्यमान आमदार – प्रभुदास बाबुलाल भिलावेकर, भाजप

प्रभुदास भिलावेकर २००२ सालापासून भाजपचे सदस्य आहेत. २००४ साली ते धारणी तालुक्यात पंचायत समितीचे सभापती बनले होते. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात काँग्रेसचे नेते रामू मातंग पटेल यांना चार वेळा तर भाजपचे राजकुमार दयाराम पटेल यांना दोन वेळा आमदारकी मिळाली आहे.

mla prabhudas bhilavekar
विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रभुदास बाबुलाल भिलावेकर, भाजप – ५७,००२
२) राजकुमार पटेल, राष्ट्रवादी – ५५,०२३
३) केवलराम काळे, काँग्रेस – ४८, ५२९
४) किसन जामकर, बहुजन समाज पक्ष – ४,६०४
५) मोतीलाल कसदेकर, शिवसेना – ४,३३४


हेही वाचा – अमरावती लोकसभा मतदारसंघ