नेवासे विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२१

 अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा (विधानसभा क्र. २२१) विधानसभा मतदारसंघ आहे.

Ahmednagar

नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडेच भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढतांना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरत आहे .हा तालुका कायम विद्रोही विचाराचा व परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो . पूर्वीं शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ असतांना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही , जरी नरेंद्र पाटील घुले हे शेवगाव चे असले तरी त्यांच कार्यक्षेत्र हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा हे असल्या मुळे ते ही याच तालुक्यातील गणले जातात.ह्या तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं .


मतदारसंघ क्रमांक – २२१

मतदारसंघ आरक्षण

मतदारांची संख्या
पुरुष – १,२७,१५४
महिला – १,१२,०४७

एकूण मतदार – २,३९,२०१


 

विद्यमान आमदार – बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे

नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ झाल्यावर यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख हे या मतदार संघाचे प्रतिनिधी झाले , विठ्ठलराव लंघे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील विरोधक संपला अस चित्र निर्माण झालं असतांना , काँग्रेस चे तात्कालीन तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे पुढे आले , त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस ने २ जिल्हापरिषद गट व २ पंचायत समिती गणात विजय मिळवला, एक गटात अतिशय निसटता पराभव झाला , त्यानंतर मुरकुटे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत गेले व शंकरराव गडाखांचा पराभव करून ते निवडून आले.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे, भाजपा – २,३९,२०१
२) शंकरराव गडाख,राष्ट्रवादी – ७९,९११
३) साहेबराव घाडगे,शिवसेना – ४,७६६
४) दिलीप वाकचौरे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २,१३९
५)दिलीप मोटे, मनसे – १,६५४


 

हे वाचा – अहमदनगर विधानसभा मतदारसंघ