घरमहा @२८८शहादा विधानसभा मतदारसंघ - म.क्र. २

शहादा विधानसभा मतदारसंघ – म.क्र. २

Subscribe

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (विधानसभा क्र.२) विधानसभा मतदारसंघ आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. धुळे जिल्हयाच्या सरहददीवर असलेला शहादा मतदार संघ तापी नदीच्या काठावर वसला आहे. बागायती शेतीमधे केळी तसेच अन्य बागायती पिके घेण्यात हा मतदार संघ अग्रेसर आहे.पुर्वाश्रमीचा नंदुरबार जिल्हयातील शहादा व धुळे जिल्हयातील दोंडाईचा परीसर जोडुन हा मतदार संघ शहादा दोंडाईचा मतदार संघ म्हणुन ओळखला जात होता. पण मतदार संघाची पुर्नरचना झाल्याने स्वतंत्रपणे शहादा मतदार संघ तयार करण्यात आला. या मतदार संघात गुजर पाटील मतदारांची संख्या निर्णायक असुन हा भाग सहकार महर्षी स्व पी के पाटील यांच्या माध्यमातुन ओळखला जातो.

मतदार संघ क्रमांक – 2

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसुचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष 161637
महीला 158616
इतर 5
एकुण 320258

- Advertisement -

विदयमान आमदार – उदेसिंग पाडवी, भारतीय जनता पार्टी

काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा तसेच पुरोगामी विचारांचा भाग असलेला शहादा मतदार संघावर सर्वप्रथम विदयमान मंत्री जयकुमार रावल यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या मतदार संघावर लावला. त्यानंतर उदेसिंग पाडवी यांनी 2014 मधे भारतीय जनता पार्टीकडुन निवडणुक लढवुन तत्कालीन मंत्री पदमाकर वळवी यांचा अवघ्या 719 मतांनी पराभव केला होता. यावेळी मतदारांनी नोटा या पर्यायावर 2755 मतदार केले. यावरुन 2014 मधे पंतप्रधान मोदी यांची लाट असतांना देखिल उदेसिंग पाडवी यांना काँग्रेसवर निसटता विजय मिळाला असे दिसते आहे.  तत्पुर्वी पाडवी यांनी 2009 मधे शिवसेनेकडुन निवडणुक लढवली होती. पण त्यावेळी त्यांना सुमारे 12 हजार मतांनी पराभुत व्हावे लागले होते.

शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदेसिंग पाडवी

2014 मधील विधानसभा निवडणुकीची स्थिती

उदेसिंग पाडवी भारतीय जनता पार्टी 58556
पदमाकर वळवी भारतीय राष्ट्रीय काँगेस 57837
राजेंद्र गावीत राष्ट्रवादी , 46966
सुरेश नाईक शिवसेना 6645


हे ही वाचा – नंदुरबार लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -