घरदेश-विदेशदेशभरात नवीन १०० विमानतळ विकसित करणार

देशभरात नवीन १०० विमानतळ विकसित करणार

Subscribe

लोकसभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात रस्ते आणि हवाई वाहतुकीसाठी मोठी घोषणा करण्यात आली. बहुचर्चित असलेल्या मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस- वे संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. २०२३ पर्यंत अर्थात, येत्या ३ वर्षांमध्ये मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे पूर्ण होऊन सुरू होईल तसेच देशभरात 100 नवीन विमानतळ सुरु करण्यात येतील. यात महाराष्ट्रातील काही नव्या विमानतळांचा समावेश असणार आहे.

देशभरात सुमारे ९ हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडोअर बांधण्यात येईल. ज्यामध्ये मुंबई-अहमदाबाद या मार्गांवर इकॉनॉमिक कॉरिडोर उभारण्यात येणार आहे. देशाला लाभलेल्या ३ हजाराहून जास्त किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीसाठी २ हजार किलोमीटरचे किनारी रस्ते तयार करण्याचे वचन अर्थमंत्र्यांनी 2020-2012 चा अर्थसंकल्पात दिले आहे. तसेच पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, 3 हजार किमीच्या कोस्टल रोडची उभारणी करणार येईल, अशी माहिती शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

- Advertisement -

2024 पर्यंत उभारणार 100 विमानतळ
उड्डाण योजनेस पाठबळ देण्यासाठी 2024 पर्यंत 100 नवीन विमानतळ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थंसंकल्पीय भाषणात लोकसभेत दिली आहे. त्यामुळे सध्याची विमानतळांची संख्या 600 वरून 1200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नव्या योजना काय असतील…

मुंबई-दिल्ली मेगाहायवे 2023 पर्यंत पूर्ण करणार

- Advertisement -

बंगलोर-चेन्नई महामार्गाचे कामंही लवकरच पूर्ण करणार

देशभरात नवी 100 विमानतळ विकसित करण्यावर भर

अडीच हजार किमी एक्स्प्रेस हायवे तयार करणार
9 हजार किमीचा इकॉनॉमिक कॉरिडोर उभारणार

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे ३ वर्षांमध्ये पूर्ण करणार

चेन्नई-बेंगळुरू एक्स्प्रेस लवकरच तयार होणार

2024 पर्यंत 6 हजार किमी हायवे तयार करण्याचे लक्ष्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -