घरCORONA UPDATEसांत्वन करायला गेले आणि झाले कोरोनाबाधित

सांत्वन करायला गेले आणि झाले कोरोनाबाधित

Subscribe

तीन कुटुंबामधील १५ जणांना कोरोनाची बाधा

कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास एकीकडे कोणीही नातेवाईक पुढे येत नाही. मात्र, दुसरीकडे अशाप्रकारे मृत्यू झालेल्या कुटुंबाचे सांत्वन करायला गेलेल्या शेजारच्या तीन कुटुंबांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. या तीन कुटुंबातील तब्बल १५ लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. ही घटना विक्रोळी कन्नमवार नगर एकमध्ये घडली आहे.

विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर १ मधील एका कोरेानाबाधित रुग्णावर सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या मृतावर टागोर नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर या कन्नमवार नगर १ मधील एका इमारतीमधील शेजारचे रहिवाशी त्यांच्या मृताच्या कुटुंबांचे सांत्वन करायला गेले होते. परंतु हे सांत्वन केल्यानंतरही काही दिवसांनी या सर्व कुटुंबातील लोकांना लक्षणे दिसून आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन कुटुंबातील १४ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यांच्यासह अन्य एका व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तब्बल १५ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

एकाच घरातील पाच ते सहा लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेच्या एस विभागाने याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा या तिन्ही कुटुंबातील सदस्य शेजारच्या कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांचे सांत्वन करायला गेले होते, अशी बाब समोर आली. त्यामुळे अशाप्रकारे शेजारधर्म पाळत सांत्वन करायला गेलेल्या शेजाऱ्यांना आणि हे सांत्वन करणे अंगाशी ठरले आहे. विशेष म्हणजे यातील एक व्यक्ती फुले नगर येथील असून ही व्यक्ती सुशिक्षितही आहे. त्यामुळे कोरेाना बाधित व्यक्तींच्या संपर्कात जावू नये, लांबूनच संवाद साधावा, याची कल्पना असूनही ही त्या घरी गेली आणि बाधित झाली आहे.


हेही वाचा – अनलॉक-२ म्हणजे काय ते स्पष्ट करा – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -