घरमहाराष्ट्रमेळघाटात ९ महिन्यात ५०८ बालकांचा मृत्यू

मेळघाटात ९ महिन्यात ५०८ बालकांचा मृत्यू

Subscribe

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी होता होत नसल्याचे समोर आले असून गेल्या ९ महिन्यात मेळघाटात तब्बल ५०८ बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढत चाल्याचे दिसून येत आहे. गेल्या ९ महिन्यात केवळ मेळघाटात मृत्यूमुखी पडलेल्या बालकांची संख्या ५०८ असल्याचे उघड झाले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यान कुपोषणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील ११ आदिवासी भागांमधील कुपोषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी न्यायालयात याचिकाकर्त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यावरुन न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले असून अद्याप यावर का उत्तर देण्यात आलेले नाही असा सवाल केला आहे.

मेळघाटात ५०८ बालकांचा मृत्यू

मेळघाटामध्ये गेल्या नऊ महिन्यात ५०८ बालकांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांना या भागात जाऊन काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप एकही डॉक्टर तेथे गेलेले नसून याविषयीचे अहवाल सादर करण्यात आले आहेत. तसेच ‘मुलांचे मृत्यू कशाने होत आहेत याचे कारण शोधून काढण्यासाठी काहीही केले जात नाही’, असे मेळघाटामधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाला सांगितले आहे.

- Advertisement -

सरकारने याविषयी सामाजिक संस्था आणि मेळघाटात काम करणाऱ्यांशी चर्चा करायला हवी, तसेच टीआयएसएस सारख्या संस्थांची मदत घेऊन या समस्येवर तोडगा काढायला हवे’, असे खंडपीठाने सांगितले. तसेच मेळघाटामधील कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंविषयी केंद्र सरकारला कळविण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहेत. त्यासोबतच उच्च नायायालयाने देखील याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा करायचे आदेश अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना दिले आहेत.

वाचा – मेळघाटात ३० दिवसात ३७ बालकांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -