अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण

पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

Pune
Additional Commissioner of Pune Municipal Corporation Rajendra Nimbalkar has been beaten up by corporator party workers
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण

अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे महानगरपालिकेत घडला आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या समोरच हा प्रकार घडला. महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गटनेते तसेच नगरसेवक हे शहरातील जलपर्णी हटवण्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी करत सोमवारी महापौरांच्या दालनातच आंदोलन करत असताना हा प्रकार घडला आहे. जलपर्णी हटवण्याच्या कामात भाजप नेते आणि महापालिकेतील अधिकारी यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना नगरसेवक आणि निंबाळकर यांच्यात बाचाबाची झाली.

महापौर दालनात मोठा गोंधळ

निंबाळकर यांनी प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांची लायकी काढल्याने प्रकरण अधिक चिघळले आणि नगरसेवकांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना मारहाण केली. यावेळी महापौर दालनात मोठा गोंधळ उडाला आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने अतिरिक्त आयुक्तांना दालनाच्या बाहेर नेले. मात्र, महापौरांच्या दालनातच अतिरिक्त आयुक्तांना मारहाण झाल्याने महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती.


हेही वाचा – पुणेरी टोला; ‘गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, पुण्याच्या पाण्याची लावली वाट’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here