घरमहाराष्ट्रपुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका - अजित पवार

पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका – अजित पवार

Subscribe

पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका, आता पूर्वी सारखे पुढारी राहिले नाहीत, असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

नियुक्तीपत्रक अजित पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. तेव्हा एका विद्यार्थ्यांने अजित पवार यांना वाकून नमस्कार केला तोच धागा धरत ‘पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका, आता पूर्वी सारखे पुढारी राहिले नाहीत. तुम्ही तुमच्या आई वडील आणि लग्न झाल्यानंतर सासु सासऱ्यांना नमस्कार करा. त्या पुढाऱ्यांची कुंडली पाहिली तर तुम्हाला वाटेल कुठून अवदसा आठवली आणि पाय पडलो’, अस विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित तरुणांना भाषणात अजित पवार यांनी सांगितले. ते पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विदयार्थी उपस्थित होते.

पार्थ अविवाहित तरुणाचे प्रश्न मांडेल

‘शिरूर लोकसभा मतदार संघात उच्च शिक्षित असलेल्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. पार्थ तो तर अविवाहित (बॅचलर) आहे त्याला संधी देण्यात आली. काही लग्न झालेले उमेदवार लोकसभेत गेले पाहिजेत. अविवाहित तरुणांच देखील कोणीतरी प्रतिनिधित्व केले पाहिजे. त्यांच्या ही समस्या आहेत त्या लोकसभेत मांडल्या पाहिजेत’, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

वाचा – ‘अजित पवार म्हणतात मला, तिकिटच कापेन’ संतापलेल्या दादांनी भर सभेत दिला दम

वाचा – मोहीते पाटलांनी फोन बंद केला आणि आम्हाला उत्तर मिळाले – अजित पवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -