घरCORONA UPDATECoronavirus : निधीतून २५ लाखांपर्यंतचा खर्च करण्यास परवानगी द्या; भाजप नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना...

Coronavirus : निधीतून २५ लाखांपर्यंतचा खर्च करण्यास परवानगी द्या; भाजप नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

जागतिक संकट असल्यामुळे याचा सामना करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच नागरिकांना सेवा व सुविधा देण्यासाठी नगरसेवकांना आपल्या निधीतून २५ लाख रुपयांचा  निधी खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपने केली आहे.

मुंबईमध्ये सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसह सरकारी यंत्रणा विविध उपाय योजना राबवत आहेत. महापालिकेच्या यंत्रणांबरोबरच मुंबईतील नगरसेवकही आपापल्या परिने मदतीचा हात पुढे करत आहे. परंतु हे जागतिक संकट असल्यामुळे याचा सामना करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच नागरिकांना सेवा व सुविधा देण्यासाठी नगरसेवकांना आपल्या निधीतून २५ लाख रुपयांचा  निधी खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपने केली आहे. नगरसेवक निधी खर्च करण्यासाठी अशाप्रकारे तरतूद नसल्यामुळे कोरोनासह तत्सम आपत्कालिन प्रसंगी अशाप्रकारचा निधी खर्च करण्यासाठी अधिनियमांमध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमातून  सुधारणा करण्याची सुचना भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना विषाणुच्या साथीच्या आजारामुळे सारे जग हादरुन गेले आहे. चीन, स्पेन, अमेरिका, सिंगापूर आदी राष्ट्रांमध्ये या विषाणुच्या संसर्गामुळे दरदिवशी शेकडो माणसे मृत पावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या आजाराचा धोका ओळखून महामारी घोषित केली आहे. आपल्या देशातही या आजाराचा प्रार्दुभाव होवू लागला असून भारतात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे आपल्या महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहेत. त्यातील मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशे पार झाला असून १०च्या आसपास रुग्णांचे मृत्यू झाला  आहे. तसेच  या  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. ‘कंटेमेटेड झोन’ ही २०० पार झाले आहेत. त्यामुळे भविष्यात हा आजार मोठे आव्हान ठरत आहे.

- Advertisement -

या आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी थेट संपर्क असल्यामुळे  नागरिकांच्या नगरसेवकांकडून अधिक अपेक्षा आहेत.  परंतु महापालिकेच्या अधिनियम १८८८ च्या नियमांनुसार नगरसेवक निधी केवळ नागरी पायाभूत सुविधांकरताच खर्च करता येतो. त्याचे निकष ठरवण्यात आले आहेत. परिणामी नगरसेवकांना आपल्या निधीतून अशा कामांसाठी खर्च करता येत नाही.

परंतु, ‘कोरोना’च्या आपत्कालिन प्रसंगी नागरिकांना मास्क, सॅनिटायझर्स तसेच बाधित रुग्णांच्या आवारांमध्ये जंतूनाशक फवारणी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच गरीब व गरजुंना अन्नवाटप करण्याच्या माध्यमातून नगरसेवकांना खर्चाचा भार उचलावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता, करोनाच्या पार्श्वभूमीवर व भविष्यात अशाप्रकारची आपत्ती उद्भवल्यास नगरसेवकांना आपल्या निधीतून किमान २५ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी देण्याच्याद़ष्टीकोनातून महापालिका अधिनियमांमध्ये सुधारणा केली जावी. तसेच करोनाचे हे संकट लक्षात घेता याबाबतची परवानगी देण्याकरता नगरविकास खात्याच्या माध्यमातून अध्यादेश जारी करून बृहन्मुंबई महापालिकेला त्याबाबत सुचित करण्यात यावे,अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -