घरमहाराष्ट्रनिगरगट्ट रात्र! अमोल मिटकरींना आला आरोग्य यंत्रणेचा भयानक अनुभव

निगरगट्ट रात्र! अमोल मिटकरींना आला आरोग्य यंत्रणेचा भयानक अनुभव

Subscribe

राज्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम दिसून येत आहे. आधिच खिळखिळी असेलेली आरोग्य यंत्रणा कोरोनामुळे अधिकच खिळखिळी झाली आहे. रुग्ण बेड्स, ऑक्सिजनतसंच व्हेंटीलेटर न मिळाल्याने दगावत आहेत. अनेक वाईट अनुभव कोरनाच्या या संकटात लोकांना आले आहेत. असाच वाईट अनुभव राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना आला आहे.

अमोल मिटकरी यांच्या ओळखीच्या व्यक्तीला बेडसाठी किती वणवण करावी लागली, याचा अनुभव शेअर केला आहे. या संकटात आरोग्य यंत्रणेशी संबंधित व्यक्ती किती निगरगट्ट असतात याचा अनुभव त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांची पोस्ट

‘मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र’

माझ्या मित्राचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना ICU मध्ये ऍडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. ज्यांनी फोन केला ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये ‘आयकॉन’ आणि ‘ओझोन’ अशी दोन रुग्णालये आहेत. मात्र तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. पैसा उपलब्ध असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात बेड उपलब्ध न होणे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

- Advertisement -

सर्वानुमते निर्णय घेऊन एका खासगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून आम्ही पेशंटला नागपुर मध्ये ‘वोकार्ड’ हॉस्पिटल ला (बेड व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर) त्यांच्यावर विश्वास ठेवून एका सुसज्ज ॲम्बुलन्स मध्ये रात्री एक वाजता मेडिकल ऑफिसर घेऊन नागपूरला पाठविले. रात्री साडे तीनला पेशंट घेऊन ॲम्बुलन्स त्या हॉस्पिटल समोर पोहोचली. मला रात्री साडेतीन वाजता मित्रांनी कॉल केला व ॲम्बुलन्स बाहेर उभी आहे. मात्र आत बेड उपलब्ध नाहीत असे डॉक्टर सांगताहेत असे सांगितले. पेशंट फक्त ऑक्सिजनवर आहे आणि खासगी डॉक्टरच्या सांगण्यावरून आपण तिथपर्यंत पेशंट पाठवल्यानंतर सुद्धा समोरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत नसतील तर ही बाब फार गंभीर आहे. मी तितक्याच रात्री एका खासगी कोविड सेंटरवर काही डॉक्टर मित्र व मी अनेक डॉक्टरच्या संपर्कात राहिलो. मात्र रात्री साडेतीन वाजता कुठल्याच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही. नागपूरमधील लता मंगेशकर हॉस्पिटल, Kings Way Hispital, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, ऍलेक्सीज हॉस्पिटल, वोकार्ड हॉस्पिटल, ७ स्टार हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर मुंदडा, डॉक्टर मरार, डॉ. अग्रवाल, सुजाता मॅडम, कावेरी मॅडम, आदी डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र या सर्व श्रीमंत डॉक्टरांपैकी कोणीही कुठलाही कसलाही प्रतिसाद दिला नाही.

नंतर वर्धा, सावंगी मेघे याठिकाणी फोन केले. पेशंटला परत इथे आणावे का तर अकोल्यातील सर्व दवाखान्यात फोन केले. सरकारी दवाखाने हाउसफुल, प्रायव्हेट दवाखाने हाउसफुल, नागपुर मधील दवाखाने हाउसफुल, पेशंटकडे स्वतःच्या गाड्या आहेत, अनेक मोठ्या लोकांशी संपर्क आहेत, असे असतानासुद्धा पेशंटला एक व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसणे हे फार धक्कादायक आहे. अखंड प्रयत्नानंतर शेवटी सरकारी दवाखान्यातच सद्यस्थितीत पेशंटला भरती करावे लागले आहे. (विचार करण्यासारखी बाब ही की मी आमदार असताना व पेशंट सुद्धा आर्थिक सक्षम असताना जर प्रायव्हेट डॉक्टर्स असा जीवघेणा खेळ खेळून, रात्री फोन बंद करून प्रतिसाद देत नसतील तर सामान्य माणसाचं जगणं म्हणजे हा एक फक्त खेळ आहे असे समजायचे का?? )

श्रीमंत लोकांची अशी अवस्था तर गोरगरिबांच्या अवस्था किती बिकट असतील ना?? आता ह्या साखळ्या शोधून काढाव्या लागतील. मग आमच्या जीवाशी खेळायची वेळ आली तरी बेहत्तर. मात्र हा माज, ही मस्ती अशीच सुरु राहिली तर येणाऱ्या काही दिवसात प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती जग सोडुन गेलेल्या असतील.
तूर्तास आपल्या मदतीला काही नं टाकतोय, संकटात असणाऱ्यांना मदत करावी ही विनंती.

कंट्रोल रूम NMC नागपूर
०७२१२२५६७०२१

Sawai NMC नागपूर
९४२१९०८०८७

कृष्णा सीरनमवार नागपूर
८५२७७८६५७५

वॉर्ड ऑफिसर व मेडिकल ऑफिसर
१९१९

महाराष्ट्र कंट्रोल रुम
मुंबई १९१९
१०७५
(आपण सर्वांनी मिळून आता हे संकट ओळखायला शिकलं पाहिजे. गरजवंताना मदत करा. मी घेतलेला अनुभव फार भयानक होता. अशी वेळ शत्रुवर सुद्धा येऊ नये.)

“मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र ” माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क…

Posted by Amol Mitkari on Sunday, 13 September 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -