घरमहाराष्ट्रऔरंगाबाद पालिकेत एमआयएम नगरसेवकांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न

औरंगाबाद पालिकेत एमआयएम नगरसेवकांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न

Subscribe

एमआयएमच्या नगरसेवकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केल्या त्यानंतर काही नगरसेवकांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयएमच्या ६ नगरसेवकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबादचे वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला. त्यावरुन एमआयएमच्या नगरसेवकांनी सभे दरम्यान गोंधळ केला. एमआयएमच्या नगरसेवकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केल्या त्यानंतर काही नगरसेवकांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयएमच्या ६ नगरसेवकांविरोधात कारवाई करत त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. महापालिकेतील या गोंधळानंतर सर्वसाधरण सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर पालिका सभागृहात पोलीस दाखल होत त्यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना शांत केले.

औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. आज महापालिकेची सर्वसाधरण सभा होती. या सभेमध्ये शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली. त्याचवेळी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावाची मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी ठेवला. याकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्रमक होत सभागृहामध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सर्व एमआयएमचे नगरसेवकांनी थेट सभापतीच्या समोर जाऊन मागणी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -