Bhima Koregaon : हिंसाचार प्रकरणी आठ जणांविरोधात FIR दाखल; NIA ची कारवाई

bhima-koregav
भीमा-कोरेगाव हिंसाचार

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे. भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आज, शुक्रवारी NIA ने स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली. त्यापाठोपाठ आजच आठ जणांविरोधात FIR दाखल केल्याची कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

काय आहे प्रकरण

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातील शनिवार वाड्याबाहेर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसात्मक भाषणे केल्याचा आरोप पोलिसांनी लावला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा, सुधा भारतद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली होती. तसेच इतरांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली. आज, शुक्रवारी या प्रकरणी NIA ने आठ जणांना अटक करण्यात आली. इतर संघटनांना पुढे करून एल्गार परिषद ही केवळ चेहरा होती त्यामागून हे माओवादी कार्यकर्ते त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करत होते, असाही आरोप करण्यात आले आहेत. एल्गार परिषदेत सुधीर ढवळे आणि कबीर कलामांचच्या इतर सदस्यांनी आक्षेपार्ह गाणी सादर केली. समाजात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्ये करून पत्रके आणि पुस्तिका वितरित केल्या असे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा –

वेळ आली तर तलवार काढेन; संभाजीराजेंचा सरकारला इशारा