घरमहाराष्ट्रअशोक चव्हाणांनी राजकारणच सोडलं पाहिजे - विनोद तावडे

अशोक चव्हाणांनी राजकारणच सोडलं पाहिजे – विनोद तावडे

Subscribe

विनोद तावडेंनी काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. शिवाय अशोक चव्हाण यांनी राजकारण सोडण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत भांडणे आता शिगेला पोहोचली असून, ती मिटवायला दिल्लीवरुन त्यांच्या प्रभारी नेत्यांना यावे लागत आहे. काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व पूर्णपणे गोंधळलेले आहे. त्यामुळे अशा काँग्रेसच्या मागे राज्यातील जनता जाईल का? असा सवाल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. तसेच, ‘आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांनी राजकारणच सोडलं पाहिजे’, असं देखील ते म्हणाले. भाजप आणि शिवसेना यांच्यातला वाद आता संपुष्टात आल्याचं चित्र निर्माण केलं जात असताना काँग्रेसमधला अंतर्गत वाद वेळोवेळी समोर येत आहे. नुकताच काँग्रेसनं सांगलीतील पेच सोडवला असला, तरी राज्यातल्या इतर ठिकाणच्या जागांचे पेच काँग्रेसला सोडवता आले नसल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंनी काँग्रेसवर टीका केली आहे.


ही क्लिप तुम्ही ऐकली का? – अशोक चव्हाणांच्या ऑडिओ क्लीपने खळबळ

‘नांदेडच्या उमेदवारीचा सर्वाधिक आनंद पृथ्वीराज चव्हाणांना’

दरम्यान, यावेळी विनोद तावडेंनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचाही उल्लेख केला. ‘अशोक चव्हाण यांना नांदेडची उमेदवारी बदलून घ्यायची होती. पण ती घेता आली नाही. याचा सर्वात जास्त आनंद हा पृथ्वीराज चव्हाण यांना झालेला दिसत आहे’, असं ते म्हणाले. ‘विखे पाटील पडद्यामागे जात आहेत आणि मग महाराष्ट्रात एक हाती नेतृत्व आपल्याला मिळेल या आनंदापाई पृथ्वीराजबाबा आज खूश आहेत’, अशी टीकाही तावडे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या उच्च न्यायालयाच्या अभिप्रायावर जे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले, त्याबद्दल बोलताना तावडे म्हणाले की, ‘आदर्श घोटाळयात उच्च न्यायालयाने यापेक्षा अधिक गंभीर शब्दात त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी राजकारणच सोडलं पाहिजे’.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस चंद्रपूरप्रमाणे औरंगाबादचाही उमेदवार बदलणार?

‘युती फोडण्याचं स्वप्न भंग झालं’

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी उपस्थित राहाण्याचं विनोद तावडेंनी जोरदार समर्थन केलं. ‘आज एनडीएची जी एकजूट बघायला मिळाली, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनागर येथे उपस्थित राहून भाजप-शिवसेना युती कशी घट्ट आहे हेच दाखवून दिले आहे, त्यामुळे भाजप शिवसेना युतीला आतून फोडता येईल, असं स्वप्न पाहाणा-यांचं स्वप्न आता भंग झालं आहे’, असंही तावडे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -