घरमहाराष्ट्रपुण्यात ३० वर्ष जुनी दुमजली इमारत कोसळली

पुण्यात ३० वर्ष जुनी दुमजली इमारत कोसळली

Subscribe

पुण्यातील केशवनगर परिसरात असलेली एक इमारत आज दुपारी अचानक कोसळली. या घटनेनंतर तेथील अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले. ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत ८ जणांना काढण्यात यश आले आहे. ज्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. केशवनगर परिसरात असलेली ही इमारत ३० वर्ष जुनी असून तिला पालिकेने धोकादायक घोषित केले होते. इमारत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. येथील स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -