घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली

Subscribe

हिंगणघाट येथे शिक्षक तरुणीसोबत घडलेल्या जळीत कांडानंतर राज्यात संतापाची लाट पसरली. आज कॅबिनेटच्या बैठकीत देखील या विषयाची चर्चा झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका मांडली. मात्र दुसरीकडे या प्रकरणावरुन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये मात्र शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना बावळट म्हटले आहे, तर चाकणकर यांनी चित्रा वाघ यांचा पायगुण वाईट असल्याचे आपल्या फेकबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शिक्षक तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली. तर शासनाने तत्परता दाखवत पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र या हॉस्पिटलमध्ये पीडित तरुणीला मदत मिळत नसल्याचा आरोप भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच राज्य सरकार अशा घटना रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही वाघ यांनी केली होती.

- Advertisement -

चिञा वाघ,थोडीफार माहिती घेऊन बोलत जा,वाईट वाटतंय असं तुम्हाला पाहुन, स्वतःच्या अस्तित्वासाठीची हि केविलवाणी धडपड. …

Rupali Chakankar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 5, 2020

 

- Advertisement -

चाकणकर यांनी काढला वाघ यांचा पायगुण

“चित्रा वाघ यांना कायम सत्ताधारींवर टीका करावी लागते. जिकडे जातात तिकडे सत्तेतून पायउतार व्हावे लागते…. पायगुण. विरोधक म्हणून शुभेच्छा पण अशा ठिकाणी राजकारण करू नका.”, अशी फेसबुक पोस्ट चाकणकर यांनी लिहिली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा यांनी काल नागपूर रुग्णालयात भेट देऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. भाजपची सत्ता गेल्यामुळे चित्रा वाघ हताश झाल्या आहेत, त्यातूनच त्या हिंगणघाट प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आरोप केला. तसेच पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचीही घोषणा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑरेंज सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मराल यांनीही सरकारकडून चार लाख मिळाले असल्याची माहिती दिली आहे, असंही चाकणकर यांनी सांगितले.

हे वाचा – हिंगणघाटसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही – मुख्यमंत्री

रुपाली चाकणकर यांच्या प्रतिवादानंतर चित्रा वाघ खवळल्या आहेत. चाकणकर बावळट असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मी मागणी केल्यानंतर राज्य सरकारने आर्थिक मदत दिल्याचा दावा वाघ यांनी केला. चित्राव वाघ यांच्या या वक्तव्यानंतर अद्याप चाकणकर यांनी उत्तर दिलेले नाही.

 

'आंध्रप्रदेशचा कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू'

'आंध्रप्रदेशचा कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू'

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 5, 2020

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -