Coronavirus: गावबंदी म्हणजे औषधापेक्षा इलाज भयंकर

कोणी अनोळखी व्यक्ती गावात येऊ नये म्हणून हे तरुण गावांच्या वेशीवर गर्दी करित आहेत.

Thane
Village blockade
गावबंदी म्हणजे औषधापेक्षा इलाज भयंकर

करोनोच्या महामारीवर सध्या तरी औषध सापडलेले नाही. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरी बसावे असे देशाचे पंतप्रधानांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगीतले आहे. दरम्यान, करोनोच्या धसक्याने प्रत्येक गावखेड्यात बाहेरील लोकांना गावबंदी केली जात आहे. परंतू हे करित असताना गावाच्या वेशीवर बरेच तरुण गर्दी करत असल्याने मुख्य हेतूला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे ही बंदी म्हणजे “औषधापेक्षा इलाज भयंकर” असेच म्हणायची वेळ आली आहे. करोनोच्या महामारीने संपूर्ण जग धास्तावले आहे. अजून तरी आपल्या देशातील परिस्थिती आपल्या हातात आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवडे संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून घरीच राहण्याचे आवाहन केले होते, मुख्यमंत्री यांनी देखील असेच सांगितले. यामागील उद्देश इतकाच होता, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचे संक्रमण रोखण्याची गरज आहे. त्यामुळे गर्दी टाळणे खुप महत्वाचे आहे. आणि याकरिता लॉकडाऊन केले आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील सर्व पेपर बंद आहेत. शासनाने काय निर्णय घेतला आहे हे फक्त इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियातून ग्रामीण भागातील नागरिकांना कळते. पण अनेक वेळा लाईट जात असल्याने बातम्या बघायला मिळत नाहीत आणि सोशल मीडियावरील माहितीची खात्री देता येत नाही. यातून आज कल्याण तालुक्यासह राज्यातील बहुतांश गावातील लोकानी गावबंदी केली आहे.


हेही वाचा – coronavirus : दादा माणूस ! 50 लाखांचे तांदूळ गरजूंना दान

गावातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे दगड, बाबळीचे, बोरीचे काटे, बांबू व इतर वस्तू टाकून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे गावातील कोणाला बाहेर जाता येते नाही तर बाहेरील कोणी आत नाही. कल्याण तालुक्यात १२४ महसूली गावे असून ४६ ग्रामपंचायती आहेत. म्हारळ वरप कांबा पावशेपाडा, रायते आणे भिसोळ आपटी, कुंदे, मामणोली, म्हसरोडी दानबाव, चौरे काकडपाडा, उशीद वाशिंद, बापगाव फळेगाव, मढ शेरे, पळसोली, वेळे, घोटसई, म्हसकळ शिरडोण आदी गावांमध्ये हीच परिस्थिती असून शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, भिवंडी, मधील ग्रामीण भागात अशीच परिस्थिती आहे. यातूनही अधिक अडचण म्हणजे गावात कोणाला काही एमर्जन्सी असेल तर गाव सोडू शकत नाही. याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे ज्या करोनोच्या भितीने या तरुणांनी गावबंदी केली आहे, त्याच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. कारण कोणी अनोळखी व्यक्ती गावात येऊ नये म्हणून हे तरुण गावांच्या वेशीवर गर्दी करित आहेत. यामध्ये पाच पेक्षा जास्तच म्हणजे १०-१५ जण असतात यातून करोनाचा धोका अधिक संभवतो. हे यांच्या लक्षात येत नाही. यातील गमतीचा भाग म्हणजे काही गावातील जाऊईबापू हे सासरवाडीत अडकले आहेत तर अनेक सासूरकरणींना गुढीपाडव्यासाठी माहेरी जाऊन देखील नो एन्ट्री देण्यात आली. अशी माहिती फळेगावचे माझी सरपंच चंद्रकात भोईर यांनी दिली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here